खडसे म्हणाल्या, `शिवसेनेच्या हल्लेखोराने माझ्यावर पिस्तूल रोखले`

रोहिणी खडसेंच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन झाले.
Rohini Khadse-khevalkar (NCP) & Chandrakant Patil (Shivsena)

Rohini Khadse-khevalkar (NCP) & Chandrakant Patil (Shivsena)

Sarkarnama

मुक्ताईनगर : एकानं मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला.. आपल्याला जिवे मारण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा दावा ॲड. रोहिणी खडसेंनी (Rohini Khadse) केला.

<div class="paragraphs"><p>Rohini Khadse-khevalkar (NCP) &amp; Chandrakant Patil (Shivsena)</p></div>
रोहिणी खडसेंवरील हल्ला; सेनेच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोमवारी रात्री घडलेल्या घटनेबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत हल्ल्याची थरारक कहाणी सांगितली. त्या म्हणाल्या, सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे व वाहनचालक मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना कारवर(एमएच १९ सीसी-१९१९) हल्लेखोरांनी हल्ला केला. अचानक तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तिघे शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी होते.

<div class="paragraphs"><p>Rohini Khadse-khevalkar (NCP) &amp; Chandrakant Patil (Shivsena)</p></div>
भागवत कराड यांनी दिले दोंडाईचाला ५० कोटी गिफ्ट!

एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकानं मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, असं त्या म्हणाल्या.

मी घाबरणार नाही

मला मारण्यासाठीच हे तिघेजण आले होते. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

मुक्ताईनगर राष्ट्रवादीच्या वतीने पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करून हल्लेखोर यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली तसेच मोठ्याप्रमाणात घोषणाबाजी देण्यात आल्या या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ईश्वर राहणे, निवृत्ती पाटील, यु डी पाटील, राजेंद्र माळी, योगेश कोलते, रवींद्र पाटील, संजय कोळी, योगेश काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

-------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com