अस्थिर सरकारचे विहितागावच्या हजारो शेतकऱ्यांना गोड गिफ्ट!

विहितगाव, बेलदगव्हाण आदी गावांच्या जमिनीवरील देवस्थानची मालकी रद्द होणार.
Balasaheb Thorat & MLA Saroj Ahire with party workers
Balasaheb Thorat & MLA Saroj Ahire with party workersSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रातील (Mahavikas Aghadi) प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या विहितगाव, (Nashik) बेलदगव्हान, वाढोलीया गावांच्या जमिनींवर देवस्थानची नोंद होती. याबाबत ५० वर्षे शेतकऱ्यांचा लढा सुरु होता. सध्या सरकार अस्थिर आहे, मात्र त्यांचे व्हीजन पक्के असल्याने आज या अस्थिर सरकारने या हजारो शेतकऱ्यांना (Farmers) गोड गिफ्ट दिले. त्यामुळे या गावांत आज शेतकऱ्यांनी सरकारला अक्षरशः दुवा दिल्या. (Revenue Department cancel the Devsthan name from land record)

Balasaheb Thorat & MLA Saroj Ahire with party workers
शिंदे साहेब...सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो!

गेले पन्नास वर्षे शहरातील विहितगाव, बेलदगव्हाण आणि मनोली महसूल रेकॅार्डला नाशिकच्या श्री. बालाजी देवस्थानचे नाव मालक सदरी लावण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही बदल, वारस नोंदी करायच्या असल्यास त्यांना या देवस्थानचा ना हरकत दाखला सक्तीचा होता. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या देणग्या द्याव्या लागत होत्या. त्याबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती, अशी तक्रार होती. त्या विरोधात गेले पन्नास वर्षे लढा सुरु होता.

Balasaheb Thorat & MLA Saroj Ahire with party workers
‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर’

याबाबत विहितगांव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींवर असलेले बालाजी देवस्थानचे नाव ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्याचा मार्ग आज मोकळा झाला. आमदार सरोजताई आहिरे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले. या प्रलंबित असलेल्या प्रश्नावर विहितगांव, बेलतगव्हाण, मनोली या गावांतील शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे नाव कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याच्या वतीने न्याय निर्णय देण्यात आला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेले देवस्थान चे नाव कमी होणार आहे.

अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न आमदार झाल्यानंतर अवघ्या २.५ वर्षात मार्गी लावला व निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पूर्ण केला, याबद्दल समस्त विहितगांव (प्रति पंढरपूर) ग्रामस्थांच्या वतीने आमदार सरोजताई आहिरे यांचे अभिनंदन केले. आज याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याच्या वतीने विहितगाव शिवारातील १६०५ ही नोंद रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

यावेळी आमदार सरोज आहिरे, निवृत्ती अरिंगळे, संजय कोठुळे, विलास धुर्जड, संजय हंडोरे, शरद पाळंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अद्यक्ष विक्रम कोठुळे, सुनील धुर्जड, राजेंद्र मांडे, शिवाजी हंडोरे, सीताराम पाळंदे, रविंद्र हंडोरे आदी उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com