यावल ‘तहसील’चा कारकून लाचखोरीतही ‘अव्वल’

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना दुसऱ्यांदा पकडले.
यावल ‘तहसील’चा कारकून लाचखोरीतही ‘अव्वल’
Mukhtar TadviSarkarnama

यावल : येथील तहसील (Revenue) कार्यालयातील अव्वल कारकून मुक्तार फकिरा तडवी (एम. एफ. तडवी) याला पाचशे रुपयांची लाच (ACB) स्वीकारल्याप्रकरणी पकडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ‘तहसील’सह तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तडवीची लाच स्वीकारण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही त्याने लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. (Clerk arrest second time under anti bribe case)

Mukhtar Tadvi
केंद्राच्या निर्यातबंदीच्या धोरणामुळेच कांदा उत्पादक संकटात आले

तक्रारदाराच्या वडिलांची मोहराळे शिवारात शेतजमीन असून, त्या शेतजमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे याबाबत येथील तहसीलदारांकडे दावा दाखल केला गेला होता.

Mukhtar Tadvi
राज ठाकरेंना अडवणाऱ्या पहिलवान, साधूंनी आदित्य ठाकरेंचे दिमाखदार स्वागत केले!

या दाखल केलेल्या दाव्यामधील तहसीलदारांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय शुल्काव्यतिरिक्त तक्रारदाराकडे एम. एफ. तडवी यांनी पंचांसमक्ष स्वतःसाठी ५०० रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम श्री. तडवी यांनी स्वतः पंचांसमक्ष तहसील कार्यालयात स्वीकारली म्हणून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पर्यवेक्षण अधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव तपास अधिकारी असून, उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील यांच्या पथकाने सापळा लावून ही कारवाई केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in