Jalgaon Breaking : महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड कायम : ‘मॅट’च्या निर्णयाने सरकारला चपराक

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.
Dr Vidya Gaikwad
Dr Vidya GaikwadSarkarnama

जळगाव : जळगाव (Jalgaon) महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड (Dr Vidya Gaikwad) यांची नियुक्ती करावी, असा आदेश ‘मॅट’ने (Mat) दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. ‘मॅट’च्या निर्णयामुळे शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारला (Government) चपराक मिळाली आहे. (Retain appointment of Dr Vidya Gaikwad as Jalgaon Municipal Commissioner : Order of Mat)

जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणे आले. त्यांच्या जागी परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ जळगाव येथे येऊन पदभार स्वीकारला, त्याचवेळी डॉ. गायकवाड या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप डॉ. विद्या गायकवाड यांनी केला होता.

Dr Vidya Gaikwad
Sangola News : गणपतराव देशमुखांच्या नातवाने पुन्हा वर्चस्व राखले : शहाजीबापू-दीपक साळुंखेंना तीन जागा

डॉ. विद्या गायकवाड यांची जळगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होऊन केवळ सहा महिने झाले होते. तसेच, बदलीचे कोणतेही कारण नसताना ही अचानक बदली का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करून त्यानी ‘मॅट’मध्ये अर्ज दाखल केला होता.

Dr Vidya Gaikwad
Narendra Patil On Shinde : सरकारला ७ महिने झाले अन॒ मुख्यमंत्री शिंदेंवर पाहिला हल्लाबोल भाजप उपाध्यक्षानेच केला...

‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते. ‘मॅट’मध्ये तब्बल दोन महिने याची सुनावणी चालली. अखेर आज (ता. ३१ जानेवारी) निकाल लागला असून डॉ. गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. त्यांची जळगाव महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करावी, असे आदेश ‘मॅट’ने सरकारला दिला आहे.

Dr Vidya Gaikwad
Sharad Pawar News : पवारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादी खासदारावरील निलंबन मागे घेण्याची केली विनंती

दरम्यान, डॉ. गायकवाड यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले देविदास पवार यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in