राज ठाकरेंना इशारा?... राणा दाम्पत्याचे काय झाले लक्षात आहे ना?

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.
Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj Thackeray
Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj ThackeraySarkarnama

नाशिक : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सध्या राज्यात जातीय तेढ वाढविण्याचे काम सुरु आहे. परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्यांना सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. कायदा हातात (Law & Order) घेणाऱ्यांची काय अवस्था होते हे आपण नवनीत राणा (Navnit Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) या दांपत्याच्या आजच्या स्थितीवरून पाहतच आहात, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj Thackeray
भोंग्या' मागचा खरा 'ढोंग्या' नागपूरचा : सुनिल शेळके

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला, त्या वेळी मार्गदर्शन करताना दोघांनी राज ठाकरे यांच्या निषेधाच्या ठरावाच्या मागणीला उत्तर देताना त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, ॲड. माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, नितीन पवार, श्रीराम शेटे, माजी आमदार दीपिका चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, रवींद्र पवार, कोंडाजी मामा आव्हाड आदी उपस्थित होते.

Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj Thackeray
राजगड कारखाना निवडणूक: निवडणूक निर्णय अधिका-यांसमोर निर्माण झाला पेच

ते म्हणाले, राज ठाकरे म्हणजे जुनीच कॅसेट आहे. सूर्य मावळल्यानंतर सायंकाळी ते सभा घेतात, जाहीर सभांमध्ये त्यांना शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. सध्या त्यांचे राज्यात जातीय तेढ वाढविण्याचे काम सुरू आहे; परंतु सरकार म्हणून जातीय सलोखा राखण्याचे काम आम्ही करत असून, बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडतोय. तुम्ही जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, इंधन दरवाढ या प्रश्‍नांकडे लक्ष देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सुपारीबहाद्दर राज ठाकरे

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की राज ठाकरेंच्या सभेला महत्त्व नाही. नाशिककरांना त्यांचा स्वभाव चांगलाच माहीत आहे. राज ठाकरे सुपारीबहाद्दर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर सभांमधून ते टीका करत आहे; परंतु त्यांना पवार काय आहेत हे चांगलेच माहीत आहे. राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडू. सध्या महागाईचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्यांचे जाणीवपूर्वक शक्तिस्थळांवर हल्ला करून प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरे यांच्यात खरोखरच दम असता तर नाशिककरांनी त्यांच्या पक्षाचे तीन आमदार पुन्हा निवडून दिले असते. वारंवार नाकाला नॅपकिन लावण्यापेक्षा एकदाचे काय ते शिंकरून घ्या, असे सांगत राज ठाकरेंची नक्कल केली. जिल्हाध्यक्ष ॲड. पगार यांनी जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता आणण्याचा दावा केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com