`याद राखा, हे देवेंद्र फडणवीस बंडखोरांना संपवतील`

जळगाव शहरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली.
`याद राखा, हे देवेंद्र फडणवीस बंडखोरांना संपवतील`
Shivsena rally at JalgaonSarkarnama

जळगाव : अहो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) आपल्या पक्षातील सहकाऱ्यांचे झाले नाही, ते तुमचे काय होतील. शिवसेनेच्या (Shivsena) बंडखोरांनी खरे राजकारण ओळखावे व परत यावे. अन्यथा हे फडणवीस स्वतःच तुम्हाला संपवतील, असा इशारा जळगावच्या (Jalgaon) शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे. (Jalgaon Shivsena Office berers alert party rebel MLA)

Shivsena rally at Jalgaon
किती आले, किती संपले, शिवसेना आहे तिथेच आहे!

काल शहरात शिवसेना कार्यकर्ते, नेत्यांसह महापौरांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढली. यावेळी माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे म्हणाले, जे आमदार पक्षातून गेलेले आहेत त्यांनी सारासार विचार करावा. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांना संपविले आहे.

Shivsena rally at Jalgaon
नॅाट रिचेबल भास्कर जाधव गुवाहटीच्या मार्गावर?

जे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. त्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून थांबवून ठेवले आहे. पक्ष प्रमुखांनी तुम्हाला मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुखाची ऑफर दिली आहे. परत घरी या व स्वातंत्र्य उपभोगा. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. ‘उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत जळगाव शहरात शिवसेनेतर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार शिवसेनेत परत येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या गोलाणी संकुलातील कार्यालयापासून ही रॅली काढण्यात आली. जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख मालपुरे, महापौर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कार्यकर्त्यांच्या हातात होती. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत ही रॅली टॉवर चौकात गेली. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

आम्ही खंबीरपणे ठाकरेंसोबत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे आहोत. जे आमदार फुटून गेलेले आहेत. त्यांनी अद्याप कोणताही गट स्थापन केलेला नाही ते शिवसैनिकच आहे, त्यामुळे ते निश्‍चित परत येतील व शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली कार्य करतील, अशी आशा असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

आमदार परत येतील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही सर्व शिवसैनिक आहोत. जे आमदार गेलेले आहेत ते शिवसैनिकच आहेत. त्यामुळे ते निश्‍चित परत येतील अशी खात्री असल्याचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

शिवसेना वाढणारच

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही कायम राहणार आहोत. शिवसेनेला फुटीचे धक्के नवीन नाहीत. या अगोदरही पक्षाने असे धक्के पचविले आहेत. त्यामुळे उलट शिवसेना वाढलीच आहे, त्यामुळे या धक्क्यातून सावरून शिवसेना आणखी वाढणार असल्याचा विश्वास महानगर प्रमुख शरद तायडे यांनी व्यक्त केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in