प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

महिलांवर लज्जास्पद टिका करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.
प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा
NCP women wing demand FIR against Pravin Darekar memorandumsarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP) रंगलेल्या गालांचे (Cloured chicks) मुके घेणारा पक्ष आहे अशी महिलांवर (Womens) लज्जास्पद टिका Shameful criticism) करणाऱ्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नासिकच्या (Nashik) शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे.

यासंदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात महिलांच्या शिष्टमंडळाने अतिशय तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

NCP women wing demand FIR against Pravin Darekar memorandum
यतीन कदम यांचे डोके ठिकाणावर नाही

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रामोशी समाजाच्या मेळाव्यात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशावर टिका करतांना महिलांच्या संदर्भात लज्जास्पद भाषा वापरली. यातून भाजपाच्या पक्ष व नेत्यांची महिलांविषयी असलेली नैतिकता दिसून येते. केवळ राज्यात सत्ता नसल्याने भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. विधान परिषद वरिष्ठ सभागृह आहे मात्र भाजपने यात निवडणुकीत निवडून न आलेल्या कनिष्ठ विचारांच्या नेत्यांना संधी दिल्यामुळे असे प्रकार घडतात.

भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वीही महिलांविषयी अतिशय लज्जास्पद शब्द वापरले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकप्रतिनिधींची लाज वाटते.

पुरोगामी महाराष्ट्रात दरेकरांच्या विरोधात राज्यभर निषेध आंदोलने झाली. तरीही महिलांची माफी मागण्याचे धाडस दरेकरांनी दाखवले नाही. या कारणास्तव त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर भद्रकाली पोलीस ठाणे नासिक शहर यांना निवेदनाव्दारे करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पूर्व विभाग अध्यक्ष सलमा शेख, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे उपस्थित होत्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in