प्रादेशिक पक्ष पंतप्रधान मोंदीना पर्याय होऊ शकत नाहीत!

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली समविचारी पक्षांनी २०२४ च्या निवडणुकीत एकत्र यावे.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) पराभव करायचा की पक्षाचा विस्तार हे दोन मोठे प्रश्न आहेत. मात्र येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदी यांच्याकडून अतिशय वेगाने धार्मिक धृविकरण सुरु आहे. त्यातून देशाची राज्यघटना व लोकशाही दोन्ही संपुष्टात येतील. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखाली एकत्र येऊन भाजपचा (BJP) पराभव केला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले. (Narendra modi implimenting agenda of religious polarization)

Prithviraj Chavan
भाजप नगरसेवक म्हणाले, `कार्यवाही होणार असेल तर भुंकतो`

श्री. चव्हाण आज नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. श्रीय चव्हाण यांनी काँग्रेसचे चिंतन शिबिर, केंद्र सरकारचे आपयश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व स्तरावर फसलेले धोरण, काश्मिरमधील टार्गेट किलींग यांपासून तर राज्यसभा व महापालिका निवडणुकांपर्यत विवेचन केले.

Prithviraj Chavan
ओबीसी आरक्षणासाठी राज्य शासन कंबर कसली!

ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी सध्या देशात अतिशय वेगाने धार्मिक धृविकरण करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी रोज नवा विषय शोधला जातो. नवी कारणे पुढे केली जातात. या सर्व प्रयोगांतून २०२४ च्या निवडणुकांसाठी वातावरण निर्माण करण्याचे काम सुरु आहे. हे देशासाठी अत्यंत घातक आहे. ते वेळीच रोखले पाहिजे. अन्यथा ते जर २०२४ मध्ये निवडून आले तर देशाची राज्यघटना व सध्याची लोकशाही दोन्ही नष्ट होतील. लोकशाही असेल मात्र दिखाऊ स्वरूपाची असेल. त्यात सगळ्यांचाच कोंडमारा होईल.

श्री. चव्हाण म्हणाले, यासंदर्भात देशातील विविध प्रादेशिक पक्ष व काँग्रेस यांनी एकत्र आले पाहिजे. तसे झाल्यास मोदींचा हमखास पराभव होईल. आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यांत ते आपण केले आहे. त्यापासून बोध घेऊन सर्व समविचारी पक्षांशी काँग्रेसच्या नेतृत्वाने पुढाकार घेऊन चर्चेची प्रक्रीया सुरु करावी लागेल. त्यासाठी आपल्या हाती दोन वर्षे आहेत.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची निवडणूक हा एक मुद्दा त्याचाच भाग असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. त्यांनी सांगितले की, यासंदर्भात आम्ही पत्र लिहिले होते. त्याबाबत १२ डिसेंबर २०२० रोजी श्रीमीत सोनिया गांधी यांनी आम्हाला चर्चेला बोलावले होते. पाच तास चर्चा झाली. त्यात पक्षाला पुर्णवेळा अध्यक्ष हवा, चिंतन शिबिर व्हावे व पक्षाच्या अध्यक्षांची निवडणूक व्हावी या मागण्या होत्या. यातील दोन मागण्यांवर काम झाले आहे. श्रीमती गांधी सध्या पुर्णवेळा काम करीत आहेत. निवडणुकांची तयारी सुरू असून लवकरच पक्षाच्या अध्यक्षांची निवड होईल. ते काँग्रेसचे निर्वाचीत नेतृत्व असेल. ते नेतृत्व २०२४ च्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी चर्चेची प्रक्रीया सुरु करेल.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com