अजित पवारांना भाषण नाकारणं ही दडपशाही!

येवला येथे अजित पवारांना भाषण करण्यास नाकारल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली.
NCP womens agaition at Yeola, Yeola News in Marathi, Ajit Pawar News
NCP womens agaition at Yeola, Yeola News in Marathi, Ajit Pawar NewsSarkarnama

येवला : देहू येथील वारकऱ्यांच्या मंचावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) भाषण करू दिले नाही, हा महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान असल्याची टीका करत शहर राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसने घोषणाबाजी करत आंदोलन केले. (NCP womens wing agaitaion against BJP at Yeola)

NCP womens agaition at Yeola, Yeola News in Marathi, Ajit Pawar News
केंद्र सरकार अजित पवारांना एव्हढे का घाबरले?

याबाबत तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा तीव्र निषेध करीत घोषणा दिल्या. (Yeola News in Marathi)

NCP womens agaition at Yeola, Yeola News in Marathi, Ajit Pawar News
काँग्रेस नेता आता पेटलाय... मंत्री धडकले राजभवनावर

देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाने परवानगी नाकारली. त्यामुळे महाराष्ट्राचा जाणूनबुजून अपमान केला गेला. भाजपच्या केंद्र सरकारच्या सदर दडपशाहीचा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमून पुतळ्याला हार घालून जाहीर निषेध केला.

शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री पहिलवान, उपाध्यक्षा नीता बिवाल, समीना शेख, अलका जेजूरकर, निर्मला थोरात, नर्गिस शेख, विमल शहा, आशा काबरा, सीताबाई खलसे, आशा सातभाई, मंगल राकसे, नाझमीत शेख, इरफान शेख, रुकसना शेख, शबाना शेख, बिलकीस पठाण, अनिता लोंढे, दीपाली खैरनार, लता ताठे, सोनाली शिंदे, मंगल खैरनार, ताईबाई शिंदे, शकुंतला गायकवाड, मीराबाई खैरनार, ताराबाई शिंदे आदी महिला तसेच विकीभाई बिवाल व सचिन सोनवणे उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com