विद्रोही साहित्य संमेलन आयोजकांनी फुंकले छगन भुजबळांविरोधात रणशिंग?

विद्रोही साहित्य संमेलन आयोजकांनी सापत्न वागणूक दिल्याचा आरोप केला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama

नाशिक : संविधान सन्मानार्थ ४ व ५ डिसेंबरला नाशिकमध्ये होत असलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला प्रशासनाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिक व निमंत्रितांची केवळ राजकीय दवाबापोटी गैरसोय झाल्यास विद्रोह अटळ असून, प्रसंगी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर किंवा गोदाघाटावर बस्तानाचा इशारा आयोजकांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal
भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार ; राजकीय रुसवा फुगवा शमला

नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासकीय विश्रामगृहांसह हॉटेल्स आदींचे बुकींग आताच हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनासाठी येणारे साहित्यिक व निमंत्रितांच्या निवासाचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोजक समितीने विद्रोहाचा इशारा दिला आहे. निवासासाठी अनेक शैक्षणिक संस्थांकडे चौकशी केली. परंतु, प्रशासकीय व राजकीय दबावापोटी मदतीस अनेकांनी नकार दिल्याचा आरोप विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याबाबत साहित्यिकांशी चर्चा करून वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यारही उपसण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.

Chhagan Bhujbal
राज ठाकरे भाजप-मनसे युतीचा निर्णय सोमवारी नाशिकमध्ये घेणार?

निधीची कमतरता

विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी अंदाजे दहा लाख रूपये खर्च अपेक्षीत आहे. प्रत्यक्षात मात्र आजअखेर साधारण पाच लाखांपर्यंत निधीचे संकलन झाले असून, उर्वरित निधी मिळविण्यासाठी अडचणी येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. तरीही अनेक संस्था पुढे येत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बुधवारी (ता. ०१) नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी ११ हजार रूपये, तर सिटुतर्फे पंधरा हजार रूपयांची मदत डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com