बंडखोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

चांगलं काम करणाऱ्या सरकारच्या कामात विरोधकांनी खोडा घातला.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama

नाशिक : नव्याने सत्तेत आलेल्या बंडखोर आमदारांनी सतत आपले पाप झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) बदनाम करण्याचा प्रय्तन केला. सत्तेत येताच विकासाच्या कामांना स्थगिती दिली. विकासाचा पैसा जनतेचा आहे, कोणाच्या मालकीचा नाही, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केले. (New government shall not give stay to devolopment works)

Narhari Zirwal
छगन भुजबळांना जुन्या घराची (शिवसेना) ओढ लागली का?

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पक्षाच्या कार्यालयात झाला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळीे ते म्हणाले की, बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याच्या प्रयत्न केला आहे. कोरोनाचा कालावधी असतांना नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ साहेबांनी सातत्याने तालुकावार व जिल्हावार बैठका घेऊन यशस्वी नियोजन केले. रेशनच्या माध्यमातून अन्न, धान्याचा मोफत मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले.

Narhari Zirwal
सत्ता गेली अन् धनंजय मुंडे रमले चहाच्या टपरीवर...

ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतले. कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा नियोजनचा ५६७ कोटींचा निधी थांबविण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे पैसे आहे. ते कोणीही रोखू शकत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत असतांना भाजपकडून घाणेरडे राजकारण केले. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. आपण सर्वांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे. कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना राज्यात नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होऊ शकणार आहे. त्यामुळे तालुकावार जाऊन काम केले जाईल असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार सरोज आहिरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, डॉ. सयाजीराव गायकवाड, ऍड. शिवाजी सहाणे, विनोद शेलार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड उपस्थित होते.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in