Shivsena: बंडखोर सुहास कांदे म्हणतात, धनुष्यबाण आम्हालाच मिळेल!

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटतेय आमदार सुहास कांदे मंत्री होणार.
Suhas Kande News, Nashik News, Shivsena News
Suhas Kande News, Nashik News, Shivsena NewsSarkarnama

नांदगाव : आमदार सुहास कांदे (Suhas Kande) गुरुवारी नांदगावला दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी निवासस्थानी गर्दी केली. यातील अनेकांना श्री कांदे आमदार होतील अशी आशा होती. आज आणलेले हारतुरे मंत्री होण्यासाठी राखून ठेऊ, असे त्यांनी सांगितले. (Followers expecting Ministry for suhas kande)

Suhas Kande News, Nashik News, Shivsena News
गैरहजर राहणाऱ्यांवर नजर ठेवणार शिवसेनेची स्वतंत्र टिम

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, यासाठी आमदार कांदे यांनी शिर्डीच्या साईबाबा चरणी साकडे घातले होते. ते फेडण्यासाठी शिर्डीला गेलेले आमदार कांदे बुधवारी रात्री त्यांच्या हनुमान नगरातील निवासस्थानी आले. आमदार कांदे यांनी कुणीही हारतुरे आणू नका, जल्लोष साजरा करू नका, सत्ताबदल हे निमित्त असले व त्यात सुख असले तरी त्यात एक दर्द आहे, अशी भावना व्यक्त केली.(Shivsena Latest Marathi News)

Suhas Kande News, Nashik News, Shivsena News
एकनाथ शिंदे गटाचे आमदार चार दिवसातच गटबाजीने अस्वस्थ?

सत्कारासाठी आतुर असलेल्या कार्यकर्त्यांनी आम्ही हे हारतुरे सांभाळून ठेवतो. तुम्ही मंत्री झालात तर ते कामाला येतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी आमदार कांदे म्हणाले, गड जिंकला तरी विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. करंजवण योजना केवळ तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकवर्गणीचा १५ कोटींचा अडसर शासनाने पैसे भरून दूर केला. अन्यथा, मनमाड नगर परिषदेला हा पैसा भरणे अशक्य होते. (Suhas Kande News)

पुरातून उद्‌ध्वस्त झालेल्या नांदगावच्या वस्तीसाठी संरक्षक योजना असो की ७८ खेड्यांची नांदगाव शहराची पाणीपुरवठा योजना असो. मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेक झारीतले शुक्राचार्य आडवे येत होते. उद्धव साहेबांपुढे या समस्या अनेकदा मांडल्या. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये, यासाठी आपण स्वतः शेवटपर्यंत प्रयत्न केले.

मुंबई सोडली तेव्हा सुरवातीला आम्ही २० आमदार सोबत होतो. नंतर गुवाहाटीला ही संख्या वाढली. बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष असल्याने त्यांचा फोटो आमच्या फलकावर वापरता येणार आहे. शिवाय पुढच्या कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला नक्कीच मिळेल, असा आत्मविश्‍वास आमदार कांदे यांनी व्यक्त केला. मतदारसंघात हाताच्या बोटावर असलेली शिवसैनिकांची नाराजी ही ‘विशिष्ट’ महत्वाकांक्षेतून आली आहे. राष्ट्रवादीची हवा खाऊन आलेले मला शिवसेना शिकवायला निघाले आहेत. ज्यांचे काही कारणांमुळे गैरसमज झाले असतील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू.

मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर असून, येत्या काही महिन्यात त्याची झलक दिसायला सुरवात होईल. माझा फोकस विकासावरच आहे, अशी खात्री बाळगा, असे आमदार कांदे म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in