बंडखोर शहाजी बापूंना आता केवळ भाजपचाच पर्याय?

एकनाथ शिंदेंना साथ दिल्याने मतदारसंघात शहाजी बापूंची(Shahaji Bapu Patil) अडचण होणार.
Shahaji Bapu Patil News, Maharashtra Political Crisis News,
Shahaji Bapu Patil News, Maharashtra Political Crisis News, Sarkarnama

सांगोला : शेकाप'चा बालेकिल्ला असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात २०१४च्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार शहाजी (बापू) पाटील (Shahaji Bapu Patil) २०१९ च्या निवडणुकीत आमदार झाले. आता त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्याविरोधातील बंडात एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) साथ दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे-पाटील यांच्या उघड पाठिंब्याने आमदार झालेल्या पाटलांना पुढे भाजपच्या मदतीशिवाय दुसरा पर्यायच नाही, अशी स्थिती आहे. (Rebel Shahaji Patil have to join BJP in Future)

Shahaji Bapu Patil News, Maharashtra Political Crisis News,
बंडाच्या लाटेत वाहून गेली विदर्भातील शिवसेना...

या बंडामुळे आमदार पाटील व माजी आमदार साळुंखे-पाटील यांच्यात मात्र पक्षीय फूट पडेल हे निश्चित. त्याचा फायदा निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाला तालुक्यात होण्याची शक्यता आहे. भाजपही संधीची वाट पाहत आहे.(Maharashtra Political Crisis News)

सोलापूर जिल्ह्यावर एकेकाळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. २०१४ नंतरच्या मोदी लाटेत जिल्ह्यात कधी नव्हेत इतके सर्वाधिक सहा आमदार भाजपचे झाले आहेत. तरीदेखील तब्बल अर्धशतकाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने शहाजी पाटील हे २०१९ च्या निवडणुकीत निवडून आले. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसतर्फे एकदा १९९५ मध्ये ज्येष्ठ नेते (कै.) गणपतराव देशमुख यांचा पराभव केला होता.

Shahaji Bapu Patil News, Maharashtra Political Crisis News,
उद्धव ठाकरे सरकारचा फैसला उद्याच, राज्यपालांचे आदेश!

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात केलेल्या बंडात सांगोल्याचे आमदार पाटील यांचाही सहभाग आहे. परंतु सांगोला तालुका हा ‘शेकाप’चा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघातून त्यांच्या बंडखोरीने कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही.

सांगोला तालुक्यात आमदार पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तोच वर्ग काँग्रेसबरोबर असतानाही, अपक्ष निवडणूक लढवताना व सध्या शिवसेनेतही असतानाही त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांनी यापुढे कोणती राजकीय वेगळी भूमिका घेतली तरी अपवाद वगळता त्यांना मानणारा वर्ग हा त्यांच्यासोबतच राहील, असे सध्यातरी वाटते. सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांत (कै.) गणपतराव देशमुख, (कै.) काकासाहेब साळुंखे यांच्यानंतर आमदार शहाजी पाटील यांचीच चलती राहिली आहे.

सध्याचे शिंदेशाही बंड यशस्वी झाले तर सांगोला तालुक्यातील स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर येथील स्थानिक पातळीवर शिवसेनेचे आमदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील (विधान परिषद) व काँग्रेसच्या पी. सी. झपके यांच्या गटाने एकत्रित निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेची आगामी निवडणुकही एकत्रित लढविण्याची घोषणाही केली आहे. परंतु या बंडामुळे शिंदे गटाने भाजपशी जवळीक साधली तर स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा फेरबदल होणार हे मात्र निश्‍चित!

गेल्या कित्येक वर्षांपासून म्हणजे अगदी १९९० पासून विधानसभा निवडणुकीत (कै.) गणपतराव देशमुख विरुद्ध शहाजी पाटील असाच सामना रंगत असल्याचे चित्र होते. आमदार पाटील यांच्यामुळे शिवसेनेला तालुक्यात बळ मिळाले होते. परंतु त्यांच्या बंडामुळे किंवा त्यांच्या विरोधात आगामी निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेत राजकीय ताकदीचा सध्यातरी उमेदवार कोणीच दिसत नाही. भाजपमध्येही तसा कोणी प्रबळ दावेदार नाही. मूळचे सांगोल्याचे व भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे भाजपकडून उमेदवार ठरले असते, परंतु २००९च्या निवडणुकीतील गोळीबार प्रकरणातून ते अडचणीत आले आहेत.

सध्याचे बंडखोरीनाट्य कायम राहिले व विधानसभेची निवडणूक झाली तर भाजपामधूनही आमदार पाटील यांना उमेदवारी मिळू शकते.

काय झाडी... काय डोंगार... काय हाटील !

आमदार पाटील यांनी त्यांचे खास कार्यकर्ते रफिक नदाफ यांना फोन केला. नदाफ यांनी नेते कुठंय ? असं विचारल्यावर त्यांनी गुवाहाटीत असल्याचे सांगत, काय झाडी... काय डोंगार... काय हाटील... एकदम ओकेचं ! असं उत्तर दिलं... या दोघांमध्ये झालेला हा संवाद जाणीवपूर्वक सोशल मीडियावरून व्हायरल केला गेला आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे संदर्भ देत ठरवून काही गोष्टी उजेडात आणण्याचा प्रयत्न या संवादात केल्याचे जाणवते.

सद्यस्थिती

- सांगोल्याचा लढ'बाप्पू बंडखोरांच्या कळपात

- शिवसेनेतील बंडाळीमुळे सांगोल्यात शेकापला फायदा शक्य

- भाजपलाही ताकद वाढविण्याची संधी

- नगर परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे

- सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मर्यादित

- सांगोल्यातील पदाधिकारी उद्धव यांच्या पाठीशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com