बंडखोर चिमणराव पाटील निवडून आले, तर आत्महत्या करीन!

पारोळा येथे शिवसेनेच्या जन आक्रोश मेळाव्यात संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी बंडखोरांना इशारा दिला.
Shivsena leader Sanjay Sawant at Parola  meeting
Shivsena leader Sanjay Sawant at Parola meetingSarkarnama

पारोळा : ज्यांच्या जीवावर मोठे झाले त्यांनाच दगा दिला, त्यांना अपमानीत केले. ज्यांच्या नावाने तुम्ही मोठे झालात आज त्यांना तुम्ही विसरले. येत्या निवडणुकीत तुम्हाला शेती करायला नाही पाठवले तर शिवसेनेचा (Shivsena) मी शिवसैनिकच नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेला दगा फटका दिला. येत्या निवडणुकीत जनता यांना फटका मारल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांवर केला. (Rebel MLA foulplay with those who made them powerfull)

Shivsena leader Sanjay Sawant at Parola  meeting
निवडणूक ‘मविप्र’ संस्थेची, चर्चा मात्र राज्यपातळीवर

येथील शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी सांगितले, की यापुढे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना सांभाळा व साथ द्या, असे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शेवटच्या भाषणात सर्व शिवसैनिकांना भावनिक साद घातली होती. तेव्हा बाळासाहेबांना दिलेले वचन यांनी आपल्या स्वार्थासाठी पाळले तर नाहीच उलट उद्धवजींना अपमानीत होण्यास भाग पाडले.

Shivsena leader Sanjay Sawant at Parola  meeting
नितीन गडकरी नाशिकला बोलले ते तंतोतंत खरे ठरले!

किरकोळ स्वार्थासाठी यांनी संपूर्ण संघटना दावणीला बांधली. संघटनेची पूर्ण शक्ती फक्त आपल्या कुटुंबांसाठी वापरली. शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडले. आता शिवसैनिकांनी ताठ मानेने व संघर्ष करीत आपली संघटना पुन्हा एकदा जोमाने उभी करावी व आगामी निवडणुकांमध्ये आपली शक्ती दाखवून द्यावी असे आवाहन करीत एक शिवसैनिक शंभर कार्यकर्त्यांना जोडेल, अशी प्रतिज्ञा घेऊन संघटना काय असते हे आपण दाखवून देऊ असे त्यांनी सांगितले.

तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाल यांनी प्रास्ताविकात उद्धवजींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. माजी शहर प्रमुख अण्णा चौधरी यांनी आभार मानले. संजय सावंत व डॉ. हर्षल माने यांच्या जोशपूर्ण भाषणात कार्यकर्त्यांनी सतत घोषणा दिल्या.

मेळाव्यात माजी तालुका प्रमुख प्रशांत पाटील, माजी शहर प्रमुख अण्णा चौधरी, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार, युवा सेनेचे आबा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

....तर मी आत्महत्या करीन

यापुढे चिमणराव पाटील निवडून आले, तर मी आत्महत्या करीन, अशी प्रतिज्ञा मोंढाळे पिंपरी (ता. एरंडोल) येथील युवा सेनेचे रवींद्र पाटील यांनी केली.तर यापुढे तालुक्यातून शिवसेनेला बळकटी मिळेल. दलित सेना शिवसेनेच्या पाठीशी राहील, असे दलित सेनेचे राजू जावळे यांनी तर कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्ही शिवसेनेच्याच पाठीशी आहोत, असे एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com