Eknath Shinde: आमदार मंगेश चव्हाण यांना पुलांसाठी मिळाले ५० कोटी

Mangesh Chavan : विधीमंडळ अधिवेशनात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश येऊन निधीला मंजुरी.
MLA Mangesh Chavan
MLA Mangesh ChavanSarkarnama

चाळीसगाव : तालुक्यातील (Chalisgaon) ग्रामीण भागातील रस्ते व पुलांच्या (Roads & Bridges) दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी पावसाळी अधिवेशनात (Mansoon Session) मंजूर झाला असून, येत्या वर्षभरात या समस्या मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan)यांनी दिली. (50 Cr. Funds Sanction for Chalisgaon`s MLA Chavan)

MLA Mangesh Chavan
Eknath Khadse: एकनाथ खडसेंना आता सहकार विभागाचा दणका

तालुक्यात गेल्या वर्षी ३० ऑगस्टला मध्यरात्री अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे पुलांचे व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. छोट्या पुलांवरून पाणी जात असल्याने तालुक्यातील एकलहरे गावातील एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, नव्याने स्थापन झालेल्या भाजप- शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला.

MLA Mangesh Chavan
Manjula Gavit: एकनाथ शिंदेंकडून मंजुळा गावित यांना ५० कोटींचे गिफ्ट

या अर्थसंकल्पात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या कामांसाठी ५० कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला असून, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे दळणवळण जलदगतीने होणार असून, विकासकामांना गती मिळणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्याला पुरवणी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने आमदार चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले आहे.

मंजूर झालेली प्रमुख कामे

शिरसगाव गटार व रस्ता सुशोभीकरण, स्मशानभूमीजवळ व टाकळी प्र. दे. शिवाजी विद्यालयाजवळ पुलाचे बांधकाम, पाटणादेवी बायपास ते चाळीसगाव नगरपालिका हद्द रस्ता कॉंक्रिटीकरण, पाटणागाव ते पाटणादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता व सरंक्षणभिंत, शिवापूर गावाजवळील पूल व जोड रस्ता सुधारणा, ढरे गावाजवळील पूल व जोड रस्ता सुधारणा.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com