सत्तांतर नाट्यानंतर आमदार किशोर पाटील ‘ॲक्शन मोड’वर

पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
MLA Kishor Patil & flood affected citizens.
MLA Kishor Patil & flood affected citizens.Sarkarnama

पाचोरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेले शिवसेनेचे (Shivsena) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) हे सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा प्रवास करून सत्तांतर नाट्यानंतर मतदारसंघात परतताच कमालीचे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. कार्यकर्ते, समर्थक व अधिकाऱ्यांच्या बैठका, विकास कामांचा आढावा तसेच पूरग्रस्त भागाची पाहणी, अशा कार्यास त्यांनी गती दिली आहे. (MLA Kishor Patil visits Flood afected area in Constituency)

MLA Kishor Patil & flood affected citizens.
दादा भुसे यांना राजन विचारे शिवसेनेत येण्याचे निमंत्रण देतील का?

आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रथमपासूनच सामील झाले. राज्यात सर्वत्र बंडखोर आमदारांविरोधात निदर्शने व निषेध नोंदविण्यात आला. परंतु पाचोरा मतदारसंघात मात्र चित्र वेगळेच दिसले. आमदार किशोर पाटील यांच्या समर्थक, चाहते व हितचिंतकांनी भव्य समर्थन रॅली काढून आम्ही आमदारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर समर्थक व हितचिंतकांनी महाआरती करून आमदारांच्या मंत्रिपदासाठी श्रीरामांना साकडे घातले. आमदार पाटील मतदारसंघात परतताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

MLA Kishor Patil & flood affected citizens.
आमदार सुहास कांदेंना धक्का; गणेश धात्रक शिवसेनेचे झाले जिल्हाप्रमुख!

त्यानंतर समर्थक व कार्यकर्त्यांनी बैठकीचे आयोजन केले. त्यात आमदार पाटील यांनी मतदारसंघाच्या हितासाठीच पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट करून त्यांनी साऱ्या घटनांना उजाळा दिला. अशा परिस्थितीत मतदारसंघात पावसाने थैमान घातल्याने घरांची पडझड होऊन पशुधनाचीही हानी झाली. यासंदर्भात आमदार पाटील यांनी महसूल, पालिका व पोलिस प्रशासनास आदेशित करून आपत्ती निर्मूलनार्थ योग्य त्या उपाययोजना करण्याचे व पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव तयार ठेवा असे आदेशित केले.

आमदार किशोर पाटील यांनी भरपावसात पुराची झळ पोहोचलेल्या नागसेननगर, शिवाजीनगर, मिलिंदनगर, भीमनगर, बसस्थानक परिसर या भागाची पाहणी करून रहिवाशांना दिलासा दिला. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने पाण्याचा योग्य निचरा का होत नाही? यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. गटारी व नाल्यांची साफसफाई व कामे त्वरित पूर्ण करावीत व पाण्याचा योग्य निचरा होईल, यासाठी अलर्ट राहण्याचे आदेशित केले. रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचल्याने भुयारी मार्गाची त्यांनी पाहणी केली. शिवाजीनगरातील व कोंडवाडा गल्लीतील मंजूर पुलाचे काम सुरू करण्याचे तसेच कृष्णापुरी भागातील हिवरा नदीवरील पुलाचे उर्वरित काम प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांचे पावसाळ्यात हाल होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे पालिका प्रशासन व संबंधित ठेकेदारांना सूचित केले. पाऊस व पूरपरिस्थिती लक्षात घेता सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याबाबत सूचित केले.

भातखंडे येथील मृत जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत त्यांना मदत व सहकार्याबाबत आश्वासित केले. आषाढी एकादशीनिमित्त अंतुर्ली या आपल्या मूळ गावी व प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे आलेल्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी भेटी दिल्या. वारकऱ्यांशी सुसंवाद साधला. पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठलाची आरती करून अंतुर्ली खुर्द येथे पारणे (उपवास) सोडण्यासाठी गाव भोजनाचे आयोजनही केले. कार्यकर्ते, हितचिंतक, चाहते यांच्या शुभेच्छा घेऊन दोन दिवसांच्या धावत्या दौऱ्यानंतर ते मुंबई येथे परतले. आमदार किशोर पाटील यांच्या या ॲक्शनमोडमुळे सारेच भारवले आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com