बंडखोर आमदार सत्तेशिवाय राहूच शकत नाही

शिवसेना संपर्क नेते संजय सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जळगाव शहरात आक्रोश मोर्चा.
Sanjay Sawant News, Gulabrao Patil News, Jalgaon News
Sanjay Sawant News, Gulabrao Patil News, Jalgaon NewsSarkarnama

जळगाव : जिल्ह्यातील (Jalgaon) शिवसेनेचे (Shivsena) चार व एक अपक्ष, असे पाच आमदार फुटून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला मिळाले आहेत. आमदार विरोधात गेले असले, तरी सर्व सामान्य कायकर्ता शिवसेनेसोबत आहे, हे दाखविण्यासाठी आणि बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (ता. १) जळगावात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली. (Shivsena will Expand Agressively in Jalgaon City)

Sanjay Sawant News, Gulabrao Patil News, Jalgaon News
...आता बारी जळगाव महापालिकेतील सत्तांतराची?

येथील हॉटेल केपी प्राईडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.(Jalgaon Latest Marathi News)

Sanjay Sawant News, Gulabrao Patil News, Jalgaon News
नव्या सरकारमध्ये असणार खानदेशचे ५ मंत्री

संजय सावंत म्हणाले, की जळगाव जिल्ह्यातील चार शिवसेना व अपक्ष आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे जिल्ह्यात अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवसेनेचे आमदार गेले असले, तरी जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबत आहे. आपण प्रत्येक तालुक्यात मेळावा घेतला असून, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. जिल्ह्यातील शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, हे दिसून आले आहे.

जळगावाच्या परिस्थितीबाबत बोलताना संजय सावंत म्हणाले, की जळगावातील शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत कायम आहे. ते बंडखोरांविरोधात आहेत. हेच दाखविण्यासाठी शुक्रवारी जळगावात शिवसेनेचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी दोनला चित्रा चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. अजिंठा चौफुलीवर मोर्चा विसर्जित होईल. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

बंडखोरांना सत्तेची हाव

हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेनेचा गट स्थापन केला आहे, असे आमदारांनी म्हटले आहे. या मुद्यावर बोलताना संजय सावंत म्हणाले, की अडीच वर्षांनंतर बंडखोरांना हिंदुत्वाची आठवण झाली. हिंदुत्वासाठी आपण सत्तेतील भाजपमध्ये सामील होऊ, असे ते म्हणातात. मग आपण सत्ता सोडून विरोधी पक्षात बसू या, असे का म्हणत नाहीत? या बंडखोरांना केवळ सत्तेची हाव आहे. सत्तेसाठीच ते हापापले आहेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in