Eknath Khadse News; गिरीष महाजनांचे वक्तव्य कामकाजातून वगळले!

एकनाथ खडसेंच्या लक्षवेधी सुचनेवर कामगार मंत्र्यांनी रेमंड कंपनीचा प्रश्न आठ दिवसात सोडवण्याचे आश्वासन.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

मुंबई : जळगाव (Jalgaon) येथील रेमंड मील (Raymond mill) कामगारांच्या करारावरून निर्माण झालेल्या वादामुळे कंपनी बंद झाली. कामगारांतील वादाचा हा विषय येत्या आठ दिवसांत सोडवू असे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी विधानपरिषदेत दिले. (Raymond mill workers issue on labour agreement will resolve)

Girish Mahajan & Eknath Khadse
Devendra Fadanvis; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पुर्नविकासाचा सरकारचा प्रस्ताव!

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून खडाजंगी झाली. सभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी महाजन यांचे वक्तव्य कामकाजातून वगळण्याच्या सूचना केल्या.

एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या या लक्षवेधीवर कामगारमंत्री उत्तरे देत होते. त्यातील विविध पैलुंवर सदस्यांनी शासनाचे लक्ष वेधत चर्चा घडवली. हा प्रश्न शेवटच्या चरणात असताना मंत्री महाजन यांनी बोलण्याची परवानगी मागीतली. त्यावरून सभापतींनी अनिच्छेनेच परवानगी देत वाद निर्माण करू नका, अशी सुचना केली.

Girish Mahajan & Eknath Khadse
Shivsena News; ठाकरेंच्या सभेतून भुसेच्या पुत्रांचीही कार्यक्रम होणार?

यावेळी श्री. महाजन यांनी जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. काही कामगारांनी कंपनीत घोषणा दिल्या. कामगार-व्यवस्थापन करारावरून हा मतभेद झाला आहे. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली पाहिजे, असे सांगत एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख करीत काही विधाने केली. त्यानंतर सभापतींनी हस्तक्षेप करीत ते कामकाजातून वगळत असल्याचे सांगितले.

तत्पर्वी श्री. खडसे यांनी ही लक्षवेधी मांडली. ते म्हणाले, जळगावच्या उद्योग व कामगारांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे कायम कामगारांची मान्यताप्राप्त संघटना आहे. कंत्राटी कामगार देखील आहेत. कंपनीने कामगार संघटनेने केलेल्या कराराबाबत नापसंती असल्याने काही कामगारांनी घोषणा दिल्या. एव्हढ्यावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले. या वादात कंपनीत एकतर्फी टाळेबंदी झाली. हा कामगारांवर अन्याय आहे. त्यात शासन हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवणार का? असा प्रश्न केला.

Girish Mahajan & Eknath Khadse
Abdul Sattar News: विमा कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना भरपाईचा विचार!

त्यावर कामगारमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिल्यावर किती दिवसांत सोडवणार अशी विचारणा सभापतींनी केली. त्यावर अधिनेशन संपण्यापूर्वी असे कामगारमंत्र्यांनी सांगितले. पुन्हा विचारणा केल्यावर कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढू असे आश्वासन दिले. यावेळी भाई जगताप, शशिकांत शिंदे, सचिन अहिर आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in