रयतच्या विद्यार्थ्यांकडून शरद पवारांना अनोखे अभिवादन!

चांदोरीच्या शाळेतील विद्यार्थी करणार ‘अव्यक्त भावनांना मोकळी वाट’
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

चांदोरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) हे एक समिकरण आहे. उद्या (ता. १२) श्री. पवार यांचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वात संस्था विकासचा, संस्था प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. त्याप्रति संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडून त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अव्यक्त भावनांना मोकळी वाट हा पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आदर्श युवा प्रतिष्ठानचे सिद्धार्थ वनारसे (Siddhart Vanarase) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

Sharad Pawar
धक्कादायक; देश शोकमग्न असताना चित्रा वाघ जल्लोषात सहभागी होत्या!

रयत शिक्षण संस्थेने शेकडो वर्षांपासून बहुजन, पीडित, गरीब, कष्टकरी वर्गास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून साक्षर नव्हे, तर सुसंस्कृत बनविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. या संस्थेची वाटचाल आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. याचे श्रेय जाते ते संस्थेच्या विकासात वाहून घेतलेल्या सर्व रयतसेवकांच्या निष्ठेला. यामध्ये विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांचे योगदान मोलाचे आहे.

Sharad Pawar
भाजप नेत्याच्या हत्येनंतर `राष्ट्रवादी`चा गुन्हेगारांना राजाश्रय!

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये लावलेली रयतरुपी ज्ञानज्योत आज पवारांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक नभांगणात सूर्य म्हणून तेवत आहे. उत्कर्षाच्या नव्या नव्या क्षितिजांवर आज रयतचे विद्यार्थी आहेत. देश सांभाळणारे उच्च पदस्थ अधिकारी असोत की पोट सांभाळणारा शेतकरी, लहान-मोठे क्षेत्र कोणतेही असो त्यावर रयतच्या विद्यार्थांनी यशाचा ठसा उमटविला आहेच. या सर्व जडणघडणीत पडद्याआड मोलाची भूमिका निभावली आहे ती म्हणजे शरद पवार यांनी.

रयत संस्थेचा विकास हा तिचे अध्यक्षपदी सारथ्य करणाऱ्या पवारसाहेबांच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल रयतच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. यातूनच ‘अव्यक्त भावनांची मोकळी वाट’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थांना पवारसाहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना पत्र लिहून आपल्या ऋणभावना व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. प्राप्त पत्रांपैकी उत्कृष्ट पाच पत्रांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. त्यामुळे हा उपक्रम चर्चेचा विषय आहे.

...

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाप्रति असलेल्या अव्यक्त भावनांना शब्दरूपात व्यक्त करून त्यांच्या योगदानाला अभिवादन करावे, या माझ्या इच्छेतून रयतच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत पत्रलेखनरुपी एक छोटा प्रयत्न करत आहोत.

-सिद्धार्थ वनारसे, सदस्य जिल्हा परिषद, आदर्श युवा प्रतिष्ठान

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com