टॉयलेट घोटाळ्याचा निधी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खात्यात पोहोचला?

रावेर पंचायत समिती इमारतीतील ‘स्वच्छ भारत’चे कार्यालय सील.
टॉयलेट घोटाळ्याचा निधी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या खात्यात पोहोचला?
Raver Swachh Bharat Office sealed, Jalgaon Latest News Updates, Raver Toilet scam Sarkarnama

रावेर : येथील पंचायत समितीमध्ये (Jalgaon) बहुचर्चीत टॅायलेट (Toilet scam) घोटाळा झाला. यामध्ये कंत्राटी कर्मचारी समाधान निंभोरे आणि मंजुश्री हे या प्रकरणात आहेत. मात्र समितीचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याच्या (Officers) सल्ल्याने हा घोटाळा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावाने या टॉयलेट घोटाळ्यातील अनुदानाच्या गैरव्यवहाराची मोठी रक्कम बँकेत परस्पर वर्ग झाल्याची चर्चा आहे. हा अधिकारी कोण? याची चर्चा सुरु आहे. (Jalgaon Latest News Updates)

Raver Swachh Bharat Office sealed, Jalgaon Latest News Updates, Raver Toilet scam
राज ठाकरेंना भिडणारे दीपक पांडे आता मुंबई शहरात आले!

दरम्यान याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज वाघ यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दिलेल्या निवेदनात या टॉयलेट घोटाळ्याची पाळेमुळे खोलवर रुतली असून, यात बड्या राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. किमान दहा वर्षांच्या अनुदान वाटपाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

Raver Swachh Bharat Office sealed, Jalgaon Latest News Updates, Raver Toilet scam
गडकरी येता घरी...महापालिका एका रात्रीत १६ लाखांचा रस्ता करी!

दीपाली कोतवाल यांना श्रेय

गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी कोणतीही लेखी तक्रार नसताना अंतर्गत चौकशी समिती नेमली हा घोटाळा उघडकीला आणला आहे. याबाबत श्रीमती कोतवाल यांना कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्याही नाराजीचा आणि कार्यालयीन अधिकाऱ्यांच्या असहकाराचा सामना करावा लागला. पण त्यांनी कणखरपणे आपले कर्तव्य पूर्ण केल्यानेच हा घोटाळा उघडकीला आल्याने हे सर्व श्रेय श्रीमती कोतवाल यांचेच असल्याचे पंचायत समितीतील प्रामाणिक कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे.

टॉयलेट घोटाळाप्रकरणी स्वच्छ भारत अभियानाचे कार्यालय गुरुवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्या आदेशानुसार कुलूप लावून सील करण्यात आले आहे. श्रीमती कोतवाल यांच्याकडे मुक्ताईनगर पंचायत समितीचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे आज त्या दिवसभर मुक्ताईनगर येथील कार्यालयात होत्या. मात्र बुधवारी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील पंचायत समितीत लोकप्रतिनिधी किंवा संशयित कर्मचारी फिरकले नाहीत.

बँकांचेही दुर्लक्ष

दरम्यान, पंचायत समितीकडून ज्या लाभार्थ्यांच्या नावाने अनुदान बँकेत वर्ग झाले त्यांची नावे आणि बँकेचे खाते क्रमांक जुळत नसताना देखील कॅनरा बँक आणि आयडीबीआय बँक या दोघांनी अनुदानाच्या रकमा दिल्याने हा घोटाळा झाला आहे. याकडे बँकांचे दुर्लक्ष झाले नसते, तर कदाचित हा टॉयलेट घोटाळा झालाच नसता, असे बोलले जाते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.