Girish Mahajan News : मी रावेर लोकसभा लढविण्याबाबत भाजपमध्ये कुठलीही चर्चा नाही; गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

BJP News : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama

Jalgaon : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्रातून काही आमदारांना उतरविणार असल्याची भाजपने रणनीती आखली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून आमदार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. यावर महाजनांनी स्पष्टीकरण दिले आहे. "मला रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देणार अशी कोणतीही चर्चा पक्षात झालेली नाही, या केवळ माध्यमांच्या चर्चा आहेत," असे गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगावात ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील काही मंत्री व आमदार यांना उमेदवारी दिली जाणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जामनेर येथे त्यांच्या उपस्थितीत स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Girish Mahajan
Sharad Pawar News : राष्ट्रवादीकडून अतुल बेनके जुन्नर विधानसभा लढविणार का? शरद पवार म्हणाले...

ते म्हणाले, "राज्यात भाजपकडून काही राज्यातील मंत्री व आमदार यांना लोकसभा निवडणुकीत उभे करण्याबाबत अशी पक्षात कोठेही चर्चा नाही, माझ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबतही पक्षात चर्चाच नाही. या केवळ माध्यमांच्या चर्चा आहेत."

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या कुणबी प्रमाण पत्राबाबत केलेल्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले, "दानवे यांच्याकडे जुन्या नोंदींप्रमाणे प्रमाणपत्र असेल, तर त्यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. माझ्या जामनेर मतदारसंघातही जुन्या नोंदींप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अनेकांकडे आहे. त्यामुळे वडेट्टीवार असे का बोलले मला माहीत नाही, परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षात एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे."

Girish Mahajan
Ramraje Nimbalkar News : रामराजे विरोधकांवर भडकले; म्हणाले, "आमच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न कराल, तर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com