कॉंग्रेसचे आमदार चौधरी भाजपमध्ये ? ; अफवा पसरविणाऱ्यांना आमदारांनी सुनावलं

Shirish Chaudhary : विरोधकासह पक्षातील काही विष पसरविणारी माणसे आहेत, त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा चौकटीबाहेर जाऊन त्यांना ठिकाणावर आणू ,"
Shirish Chaudhary
Shirish Chaudharysarkarnama

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा शनिवारी दिवसभर सुरु होती, त्यानंतर खडसेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर लगेतच जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे कट्टर पदाधिकारी, आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला चौधरींनी सडेतोड उत्तर दिले आहे. (Shirish Chaudhary latest news)

"माझ्या भाजप प्रवेशाबाबत विरोधकासह पक्षातील काही विष पसरविणारी माणसे आहेत, त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा चौकटीबाहेर जाऊन आपण त्यांना ठिकाणावर आणू ," असा इशारा काँग्रेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary) यांनी दिला आहे. जळगाव येथे काँग्रेस भवनात आयोजित पक्षच्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार शिरीष चौधरी म्हणाले, "खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. राहुल गांधी देश पिंजून काढत आहे. कार्यकर्त्यांनी आपला भाग पिंजून काढावा. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा जुमल्यांचा प्रतिवाद करावा लागणार आहे,"

Shirish Chaudhary
Shivajirao Adhalrao : शिंदे गटात गेलेल्या शिवाजीराव आढळरावांचे राष्ट्रवादीकडून स्वागत

"मी, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. तीन पिढ्यांपासून आम्ही कॉंग्रेसचे पाईक आहोत. गद्दारी आमच्या रक्तात नाही. परंतू विरोधकांसह आपल्याच पक्षातही विष पसरवणारी माणसे आहेत. अशांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा, आम्ही चौकटी बाहेर जावून त्यांना ठिकाणावर आणू," असे चौधरी यांनी सांगितले.

"रावेरची जागा परंपरेने आमचीच आहे. डॉ.उल्हास पाटील हे आमच्यासाठी माजी नसून आजी खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीने आम्हाला नेहमीच दाबले आहे. पक्ष नेतृत्वाने याबाबत दखल घ्यावी," असे आवाहनही शिरीष चौधरी यांनी केले आहे.

"भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच हितचिंतकांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, यामुळे ही अफवा पसरवली जात आहे. मात्र पक्ष विषयी प्रतारणा करण्याचं कुठलही कारण नाही. अशी काही भूमिका घेतली तर मी त्याबाबत स्पष्ट सांगेल. कारण यापूर्वी नेहमी माझी भूमिका ही स्पष्टपणे सांगितली आहे," असे चौधरी यांनी अफवा पसरविणाऱ्यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com