‘रश्मी शुक्लांनी ६८ दिवस माझा फोन टॅप केला : फडणवीसांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीनचिट’

जळगाव दूध संघातील बटर आणि दुध भूकटीच्या चोरीप्रकरणी एकनाथ खडसे प्रचंड आक्रमक झाले आहेत. या चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते तीन दिवसांपासून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आहेत.
Devendra Fadnavis-Rashmi Shukla-Eknath Khadse
Devendra Fadnavis-Rashmi Shukla-Eknath KhadseSarkarnama

जळगाव : रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) जेव्हा अधिकारीपदावर कार्यरत होत्या, त्यावेळी माझा फोन ६८ दिवस टॅप करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. तसेच, ज्या दिवशी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटल्या त्याचदिवशी त्यांना फोन टॅपिंगप्रकरणी क्लीनचिट मिळाली, असा दावाही त्यांनी केला. (Rashmi Shukla tapped my phone for 68 days : Eknath Khadse)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे जळगाव दूध संघातील चोरी प्रकरणी आक्रमक झाले आहेत. दूध भूकटी आणि बटर चोरीला गेल्याचा आरोप करत खडसे यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी रश्मी शुक्ला यांच्याबाबत दावा केला आहे.

Devendra Fadnavis-Rashmi Shukla-Eknath Khadse
जानकरांनी वाढविले भरणेंचे टेन्शन : राष्ट्रवादीचे प्रवीण माने इंदापूरमध्ये रासपचे उमेदवार?

ते म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी माझाही फोन टॅप केला होता. त्या कालखंडात माझे काय अंडरवर्ल्डशी संबंध आहेत की काय? अंडरवर्ल्डने धमकी दिला काय? या संदर्भात कदाचित चौकशी झाली असेल. पण फोन टॅप करण्याचं कारण अजूनही मला समजलेले नाही. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे.

Devendra Fadnavis-Rashmi Shukla-Eknath Khadse
राष्ट्रवादीच्या सदस्याच्या पाठिंब्याने भाजपच्या वंदना ईशी सभापती !

माजी सनदी अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी क्लिनचिट मिळाली आहे. त्यासंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, ज्या दिवशी रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या, त्याचदिवशी लक्षात आलं की, शुक्ला यांना क्लीनचिट मिळणार, अपेक्षेप्रमाणे त्यांना क्लीनचिट मिळालेली आहे.

Devendra Fadnavis-Rashmi Shukla-Eknath Khadse
Parambir Singh : परमबीर सिंह यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; रात्री उशिरा खलबतं !

दरम्यान, जळगाव दूध संघातील बटर आणि दुध भूकटीच्या चोरीप्रकरणी एकनाथ खडसे प्रचंड आक्रमक झाले आहेत. या चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते तीन दिवसांपासून पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आहेत.

Devendra Fadnavis-Rashmi Shukla-Eknath Khadse
Avadhoot Tatkare : ठाकरेंना मोठा धक्का ; माजी आमदार तटकरेंचा आज भाजपमध्ये प्रवेश

याबाबत खडसे म्हणाले की, जळगाव दूध संघातून ७०० कोटी रुपयांच्या बटरीची, तर २६५ कोटी रुपयांची दूध भुकटीची चोरी झाली आहे. दूध संघातून वस्तूंची चोरी झाली आहे. वस्तू चोरी गेल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा अपहार नव्हे, तर चोरी झालेली आहे. पण पोलिस अधीक्षकांचे असे म्हणाले की, आमचे दोन विचारप्रवाह आहेत, त्याचा आम्ही अभ्यास करतो आहे. आता वस्तू असताना त्याचा अभ्यास करणे, हे चुकीचेच आहे. घरातून दागिने, वस्तू चोरीला गेल्या तर पोलिस म्हणयाला लागले की याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था जिवंत राहणार नाही.

पोलिस महासंचालक यांचे २००५ परिपत्रक आहे, त्यानुसार पोलिसांना अभ्यास करायचा असेल तर २४ तासांत अभ्यास करावा आणि त्यानंतर गुन्हा दाखल करावा, असे त्यात सांगितले आहे. परिपत्रकाच्या आधारानुसार २४ तास होऊन गेले आहेत. हे परवापासून चालेले आहे. आतातरी पोलिसांचा अभ्यास झालेला असावा. त्यामुळे पोलिसांनी आता गुन्हा नोंद करावा, असे आवाहनही खडसे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com