रशीद शेख म्हणाले, आयुक्त जुम्मा के जुम्मा काम करतात!

माजी आमदार रशीद शेख यांनी शहर हितासाठी अतिक्रमण हटविणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे.
Ex MLA Rashid Shaikh News, Malegaon News in Marathi
Ex MLA Rashid Shaikh News, Malegaon News in MarathiSarkarnama

Malegaon News

मालेगाव : मालेगाव (Malegaon) आणि अतिक्रमण यांचे अगदी घट्ट नाते आहे. राजकीय आर्शिवादाशिवाय ते शक्य नसते. मात्र आता त्याचा विकासकामांनाही अडथळा होत आहे. त्यामुळे राज्यात, महापालिका सत्ता, महापौर घरात तीच मंडळी शहरात अतिक्रमण लई झाले, अशी ओरड करु लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) यांनी अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. (NCP leader rashid Shaikh criticise Commissioner for encroachment in city)

Ex MLA Rashid Shaikh News, Malegaon News in Marathi
राज ठाकरेंनी कौतुक केलेले सलीम शेख बाद, शिवसेनेची मात्र चंगळ!

शहरातील अतिक्रमणांचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमणांनी व्यापले आहेत. महापालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधी व नगरसेवक जोपर्यंत तक्रार करत नाही, तोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही, ही बाब घातक आहे. शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्ग व कुसुंबा रस्त्याचे कॉंक्रीटीकरण सुरु आहे. या रस्ते कामांसह विविध विकासकामांसाठी अतिक्रमण अडथळा ठरत आहे. (Rashid Shaikh News)

Ex MLA Rashid Shaikh News, Malegaon News in Marathi
स्वार्थासाठी ग्रामस्थांमध्ये दिशाभूल करण्याचे षड्यंत्र

महापालिका, महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे प्रयत्न करून अतिक्रमण तातडीने न हटविल्यास नगरसेवक व कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून अतिक्रमण हटवू, असा इशारा माजी महापौर तथा माजी आमदार रशीद शेख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

श्री. शेख म्हणाले, की कुसुंबा रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आल्यानंतर एका बाजूचा सिमेंट रस्ता तयार झाला. सात ते आठ फुटाचे पेव्हर ब्लॉक बसवणार आहे. जलवाहिनी फुटली, दुरुस्तीसाठी सोय म्हणून ते टाकले आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने दुचाकी, चारचाकी उभ्या राहतात. गांधीनगर टी रोड आहे. हा रस्ता जमहूरपर्यंत होणार आहे. पोलिसांनी अतिक्रमण हटविण्यासाठी सहकार्य करायला हवे. अतिक्रमण हटविणे मनपा, महसूल, पोलिस संयुक्त जबाबदारी आहे. शहरवासीयांनी याकामी सहकार्य करावे. आता काम होतंय तर कामाचा चांगला दर्जा असूनही कुसुंबा व महामार्ग कामांवर टीका होते.

आम्ही कामाचा हिशेब देतो आहे. ‘साल भर में साठ काम करने वाले आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल’ यांनी सहा कामे तरी दाखवावी, असे आवाहन त्यांनी दिले. एकही काम करता आले नाही. दोन कोटी निधीदेखील परत गेला. कृषिमंत्री दादा भुसेंच्या प्रयत्नातून शंभर कोटी निधी उपलब्ध होतोय त्यात सर्वसमावेशक कामे आहेत. यात कुठलेही राजकारण नाही.

आयुक्त, विरोधकांवर टीका

शहरातील सासूरवाशीण महिला शुक्रवारी माहेरी जातात. त्याला शहरात ‘बेटी बजार करणे जाती है’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे मनपा आयुक्त जुम्मा के जुम्मा काम करतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्यांचे ‘पाचाचे पाढे पंचावन्न’ सुरूच आहेत. आयुक्त मनपात येत नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दबाव येतो. अधिकारी फिल्डवर जात नाही. आयुक्त भालचंद्र गोसावी यांचा दबदबा नाही. आमच्यावर त्याचे खापर फुटते. विरोधकांना आरोप करण्यापलीकडे काम नाही. अतिक्रमण अपघातांना कारण ठरत आहे. अतिक्रमण, कुत्ता गोली विक्री हे शहराला जडलेले रोग आहेत. अतिक्रमण निर्मूलन मोहीम न राबविल्यास. महासभेनंतर नगरसेवक व कार्यकर्ते अतिक्रमण काढू.

- रशीद शेख, माजी महापौर तथा माजी आमदार, मालेगाव

--

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com