बलात्कार करून पळणाऱ्या गुन्हेगारास तासाभरातच अटक!

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Rape Accuse Nitin Pawar Arrest by Police
Rape Accuse Nitin Pawar Arrest by PoliceSarkarnama

नाशिक : गुन्हेगाराची (Criminal) प्रवृत्ती असली की त्याच्या मनातील प्रवृत्ती उचल खातेच. याचा प्रत्यय नाशिक शहराला (Nasik city) आला आहे. खुनाच्या (Murder) गुन्ह्यातील आरोपीला (Accuse) शिक्षा झाल्यावर चांगल्या वर्तणुकीची हमी देत पॅरोल (Parol) मिळताच, बाहेर येऊन त्याने बलात्काराचा गुन्हा केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Rape Accuse Nitin Pawar Arrest by Police
भुजबळांच्या विरोधातील तक्रार मागे घे : आमदार कांदेंना छोटा राजन टोळीचा फोन

दरम्यान या घटनेची पोलिसांनी देखील अतिशय गंभीर दखल घेतली. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी याबाबत स्वतः लक्ष घातले. त्यामुळे सबंध शहरात नाकेबंदी करण्यात आली. संबंधीत आरोपी शहर साडून पळून जाण्याचा प्रयत्नात होता. त्याचा हा प्रयत्न यशस्वी होण्याआधीच संशयीत नितीन पवार यास मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कुंदन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अटक केली.

Rape Accuse Nitin Pawar Arrest by Police
आमदार कांदेंना अंडरवर्ल्डची धमकी; भुजबळांनी उचलले हे पाऊल

राज्यात सध्या विविध शहरात असे प्रकार घडत आहे. त्यावरून मोठ्या प्रामणात राजकारण देखील होत आहे. त्याचा आधीच पोलिस यंत्रणेवर दबाव असताना ही घटना घडली. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रीया उमटल्या.

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि सध्या पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने सिडकोतील श्रीरामनगर येथील एका ब्युटी पार्लरमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अंबड पोलीस ठाण्यास भेट दिली. या घटनेनंतर आरोपी फरारी झाला आहे. २०१३ मध्ये दोन महिलांचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याप्रकरणी नितीन सुभाष पवार (वय ३२) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता. मात्र, करोना काळात पॅरोलवर बाहेर आल्याने पुन्हा एकदा त्याने शस्त्राचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com