रावसाहेब दानवेंची सल, `आम्हाला धोका देऊन अमर, अकबर, अँथनीचे सरकार केले`

श्री. दानवे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Raosaheb Dnve, BJP Leader
Raosaheb Dnve, BJP LeaderSarkarnama

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षालाच निवडून दिले होते. मात्र आम्हाला धोका देऊन राज्यात अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन झाले. या सरकारवर जनता खुप नाराज आहे. त्यामुळे पुढील निवडणूकीत राज्यात भाजपचेच सरकार येईल, असा दावा केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Centre minister of state Raosaheb Danve) यांनी केला.

Raosaheb Dnve, BJP Leader
जयंत पाटील, बाळासाहेब पाटलांमुळेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन चिघळले

श्री. दानवे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवर अनेक दोषारोप केले. ते म्हणाले, त्यांनी आम्हाला धोका दिला. त्यातून हे सरकार तीन पक्षांचे आहे. हे अमर, अकबर, अँथनी कधीच कोणत्याच प्रश्नावर चर्चा करीत नाही. एकत्रव बसून निर्णय घेत नाही. त्यामुळे एसटीचा संप, राज्यात दंगली, वैद्यकीय परिक्षेचा गोंधळ अशा अनेक समस्या निर्माण झाल्यात. त्यात सोडविण्यात ते पुर्णतः अपयशी ठरले आहे. सर्व सामान्यांना दिलासा देणारे एकही काम राज्य सरकारने केलं नसल्याचा दावा त्यांनी केला.

श्री. दानवे म्हणाले, कोव्हीडपूर्वी सुरु असलेल्या रेल्वे गाड्या आता पुर्ववत केल्या जाणार आहेत. विशेष रेल्वे सेवेचा दर्जा पुन्हा सामान्य करून रेल्वे प्रवासी भाडे देखील कमी केले जाणार आहे.

Raosaheb Dnve, BJP Leader
बाळासाहेब पाटलांना अजित पवार, वळसे पाटील यांच्या रांगेत बसायचंय....

श्री. पुढे दानवे म्हणाले, या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते माळरानावर पोचले; परंतू राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने एक नव्हे दोनदा पंचनामे करूनही काहीच दिले नाही. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. मुख्यमंत्री नसताना एकरी पन्नास हजार रुपयांची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. एकीकडे शेतकरी मदतीसाठी विनवणी करत असताना दुसरीकडे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. भाजपची सत्ता असताना धनगर समाजाने अनुसूची जमातीत समावेश करण्याची मागणी केली होती. तांत्रिक दृष्ट्या समावेश करणे शक्य नव्हते. परंतू, फडणवीस यांच्या सरकारने त्यांना मिळणाऱ्या सवलती दिल्या. त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा दिल्या पाहिजे.

वैद्यकीय परिक्षा, पेपर फुटी, शाळा सुरु करण्याबाबत निश्‍चित धोरण नाही. कुठल्याही विषयावर एकमत या सरकारमध्ये होत नाही. राज्यात ड्रग माफीयांनी धुमाकुळ घातला. राज्य सरकारमधील नेत्यांचेच नातेवाईक ड्रग्जमध्ये सापडत आहेत. असे एक ना अनेक प्रश्‍न सोडविण्याऐवजी मुळ प्रश्‍नापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दामहून आरोप केले जात आहेत. रोज पत्रकार परिषदा घेवून चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दडपण आणले जात आहे. एकुणच राज्याची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सामन्यांना दिलासा देणारं एकही काम या सरकारचे केलं नाही. म्हणून आगामी निवडणुकीत त्यांना यश मिळणार नसल्याचा दावा श्री. दानवे यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com