Shivsena: रामदास कदम यांना भूतबाधा झाल्याने ते बरळत सुटले!

शिवसेनेतर्फे रामदास कदम यांचा निषेध करीत त्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले.
Shivsena agitaion In Nashik
Shivsena agitaion In NashikSarkarnama

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) माजी नेते व शिंदे गटात सहभागी झालेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांना नाशिक (Nashik) जिल्हा बंदीचा इशारा, मंगळवारी शिवसेनेकडून (Shivsena) देण्यात आला. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह (Offensive Comment) विधान केल्याने याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होत शिवसेना कार्यालयासमोर आंदोलन केले. (Shivsena agitation in nashik against Ramdas Kadam`s offendive statement)

Shivsena agitaion In Nashik
`तो` एकनाथ त्रास देत असला तरी `हा` एकनाथ पाठीशी आहे!

कोकणातील दापोली येथे एका कार्यक्रमात रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केले.

Shivsena agitaion In Nashik
Eknath Shinde: `होय आम्ही कंत्राट घेतले आहे`

त्यानंतर पुतळ्याचे दहन करत रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. कदम यांना भूतबाधा झाली असून ते बरळत आहे. कदम यांना शिवसेनेने विविध प्रकारची पदे दिली. त्यांना मोठे केले, मात्र त्याच्या उपकाराची परतफेड ते शिवसेनेच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करून करत आहेत. असे बागूल म्हणाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी रामदास कदम यांची मातोश्री विषयी बोलण्याची लायकी नसल्याचे सांगताना शिवसैनिक त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

यापुढे असे वक्तव्य केल्यास शिवसैनिक त्यांना नाशिक जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आक्षेपार्ह विधान करणे अत्यंत संतापजनक असल्याचे सांगितले. शिवसैनिकांकडून कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. कदम यांनी खाल्लेल्या मिठाला जागावे, असे बडगुजर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, वसंत गिते, महापालिकेचे माजी गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारत आंदोलन केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in