खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, धन्यवाद मोदीजी!

किसान रेल सुरू केल्याबद्दल खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
PM Narendra Modi & MP Raksha Khadse
PM Narendra Modi & MP Raksha KhadseSarkarnama

सावदा : लोकसभा अधिवेशनादरम्यान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी गुरुवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. किसान रेलच्या (Kisan rail) यशस्वी संचालनासाठी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आभार मानले. यावेळी त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

PM Narendra Modi & MP Raksha Khadse
‘नदीजोड’साठी राज्यांची संयुक्त बैठक बोलवा

रावेर लोकसभा क्षेत्रातील रावेर व सावदा रेल्वेस्थानकापासून किसान रेल वाढविण्याबाबत व भुसावळ, निंभोरा रेल्वेस्थानकापासून नवीन किसान रेल सुरू करणे तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने नव्याने सुरू केलेल्या फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली.

PM Narendra Modi & MP Raksha Khadse
डीएनए चेक करो, सलीम शेख तुम मुसलमान नही हो सकते!

बागायतीच्या समग्र विकासासाठी मोदी सरकारच्या सप्तवर्षीपूर्तीनिमित्त केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे विविध फळांसाठी देशातील १२ राज्यातील ५३ जिल्ह्यांमधील पथदर्शी कार्यक्रमाचा विचार करून फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) (सीडीपी) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश करावा, याबाबत सुद्धा खासदार रक्षा खडसे यांनी सविस्तर चर्चा करून मागणी केली.

रावेर लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट प्रतीच्या केळीचे उत्पादन होत असून, खूप मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात येत असते. या भागातील केळीची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी असून, जर फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश झाल्यास त्या अनुषंगाने येथे होणाऱ्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने व केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वपूर्ण व फायद्याचे ठरेल. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फलोत्पादन क्षेत्र विकास (हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम) अंतर्गत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश होण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित मंत्रालयाला शिफारस करण्यात यावी, तसेच अधिक किसान रेल वाढविण्यात येऊन नवीन किसान रेल सुरू करण्यात याव्या, याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com