राजवर्धन कदमबांडे म्हणाले, आता बँकेला प्रगतीपथावर नेणार!

धुळे जिल्हा बँकेत बुधवारी झालेल्या प्रक्रियेनंतर राजवर्धन कदमबांडे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
राजवर्धन कदमबांडे म्हणाले, आता बँकेला प्रगतीपथावर नेणार!
Rajwardhan Kadambande with Bank directorsSarkarnama

धुळे : धुळे -नंदुरबार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा राजवर्धन कदमबांडे (Rajwardhan Kadambande) यांची निवड झाली. १९९१ नंतर प्रशासक मंडळाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ वगळता २००२ पासून ते अध्यक्ष आहेत. चौथ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले. विजयानंतर त्यांनी बँकेला प्रगतीपथावर घेऊन जाऊ. बँकेच्या प्रगतीसह बँकेला ‘अ’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

Rajwardhan Kadambande with Bank directors
अफवांचा बाजार गरम : भाजपचा एकही नगरसेवक अद्याप भोयरांसाठी पुढे आला नाही…

धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा भाजपचे नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, तर उपाध्यक्षपदी शहाद्याच्या सातपुडा साखर कारखान्याचे प्रवर्तक दीपक पुरुषोत्तम पाटील विराजमान झाले. श्री. कदमबांडे, श्री. पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा प्रत्येकी १२ विरुद्ध ५ मतांनी पराभव केला.

Rajwardhan Kadambande with Bank directors
मुंबई हादरली ; आफ्रिकन देशातून मुंबईतील आलेले आणखी चार जण पॅाझिटिव्ह

जिल्हा बँकेची नुकतीच १७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली. यात माजी मंत्री तथा भाजपचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शेतकरी विकास सहकारी पॅनल, तर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात किसान संघर्ष पॅनल आमनेसामने होते. माघारीवेळी १७ पैकी सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. नंतर दहा जागांसाठी निवडणूक झाली. यात किसान संघर्ष पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले होते.

मतदान, निकालाची स्थिती

असे असताना जिल्हा बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी अभिजित देशपांडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी अकरापासून प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी कदमबांडे यांच्याविरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. शरद पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी दीपक पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचे आमशा पाडवी यांनी उमेदवारी अर्ज भरला. छाननी, माघारीनंतर मतदान होऊन श्री. कदमबांडे यांच्या बाजूने स्वतःसह नवनिर्वाचीत संचालक दीपक पाटील, दर्यावगीर महंत, हर्षवर्धन दहिते, राजेंद्र देसले, अमरसिंग गावित, शीला पाटील, सीमा रंधे, भरत माळी, प्रभाकर चव्हाण, श्‍यामकांत सनेर, भगवान पाटील यांनी मतदान केले. त्यामुळे श्री. कदमबांडे विजयी झाले. प्रा. पाटील यांच्या बाजूने स्वतःसह नवनिर्वाचीत चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक, आमशा पाडवी, अपक्ष संदीप वळवी यांनी मतदान केले. हीच स्थिती उपाध्यक्षपदाचे उमेदवार दीपक पाटील व आमशा पाडवी यांच्याबाबत होती. त्यामुळे दीपक पाटील विजयी झाले.

विरोधासाठी आम्हाला बँकेत पाठविले

संचालक माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, की विरोधकाची भूमिका पार पाडण्यासाठी मतदारांनी आम्हाला जिल्हा बँकेत पाठविले आहे. आम्ही पाच संचालक सोबत आहोत. बँकेचे धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे विभाजन व्हावे, अशी आमची भूमिका आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in