`या`साठी राजवर्धन कदमबांडे यांच्याकडून धुळ्याच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन!

बँक कार्यक्षेत्रातील दहा तालुक्यांसाठी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत पात्र शेतकरी सभासदांना पुढील वर्षी दहा एप्रिलपासून नवीन वाढीव दराने पीककर्ज वाटप होणार.
Rajvardhan Kadambande
Rajvardhan KadambandeSarkarnama

धुळे : धुळे (Dhule) व नंदुरबार (Nandurbar) जिल्हा सहकारी बँकेच्या(Cooperative banks members) शेतकरी सभासदांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही गेल्या वर्षी स्वच्छेने ९६ टक्क्यांपर्यंत (Repayment of loan 96%) कर्जाची परतफेड केली. त्यांचे अभिनंदन करत बँकेत कार्यक्षेत्रातील दहा तालुक्यांसाठी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत पात्र शेतकरी सभासदांना पुढील वर्षी दहा एप्रिलपासून नवीन वाढीव दराने पीककर्ज वाटप होणार (Crop loan disbursment) असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांनी दिली.

Rajvardhan Kadambande
नितीन पिंगळे ठरले २६ भावंडांच्या कुटुंबातील पहिले डॉक्टर!

बँकेचे अध्यक्ष कदमबांडे, संचालक दर्यावगीर दौलतगीर महंत, संचालिका नंदिनी प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी जिल्हा बँकेने उत्कृष्ट व प्रगतीपथावरील कामकाज केल्याने अध्यक्षांसह संचालक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्ष कदमबाडे म्हणाले, की ३१ ऑगस्टअखेर धुळे जिल्ह्यातील २० हजार ८४० सभासदांना १५२ कोटी ९८ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील १२ हजार ३७३ सभासदांना १०६ कोटी ३२ लाख, असे एकूण ३३ हजार २१३ सभासदांना २५९ कोटी २९ कोटींचे अल्पमुदतीचे खरीप पीककर्ज रूपे किसान क्रेडिट कार्ड व मायक्रो एटीएमव्दारे वाटप केले. शासनाच्या ११ जूनच्या निर्णयानुसार बँकेने एप्रिल २०२२ पासून तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने अल्पमुदत खरीप शेती पीककर्ज वाटपाचा निर्णय घेतला आहे. पीककर्ज घेतलेल्या सभासदांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत जवळच्या शाखेत कर्ज भरणा करावा व शून्य टक्के व्याजदराचा लाभ घ्यावा.

राज्यात बँक प्रथम

धुळे जिल्ह्यात ४०५ कर्जदार पात्र, तर नंदुरबार जिल्ह्यात २३४ कर्जदार पात्र विविध कार्यकारी सोसायट्या व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना कर्जवाटप केले. २०२०-२१ पेक्षा २०२१-२२ मध्ये अधिक ६१.२९ कोटींचे पीककर्ज वाटप केले. कोरोनाचा प्रार्दुभाव असतानाही बँकेच्या ३१ मार्च २०२१ अखेर २३ कोटी ८५ लाख रूपयांनी ठेवीत वाढ झाली असून ६०७ कोटी ७९ लाखांच्या ठेवी झाल्या आहेत. पैकी १० कोटी २३ लाखांचा निधी दोन्ही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना परत केला आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. बँकेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील ७९ हजार ३५० पात्र शेतकरी सभासदांना ३०४ कोटी ८२ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला आहे. टक्केवारीनुसार आपली बँक राज्यात प्रथम व अधिकाधिक सभासदांना लाभ देणारी ठरली आहे.

Rajvardhan Kadambande
बहिणीच्या प्रचारात खासदार हिना गावित यांची प्रतिष्ठा पणाला?

शेतकरी सभासदांना इशारा

बँकेने ५३ हजार शेतकऱ्यां‍ना किसान क्रेडीट कार्डमार्फत कर्जपुरवठा केला, तर २५ हजार ५०० ठेवीदारांना रुपे डेबीट कार्डचे वाटप केले. बँक पुन्हा २० हजार ठेवीदारांना या कार्डचे वाटप करेल. जिल्हा बँकेने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनिष्ट तफावतमध्ये असलेल्या संस्थांकडून बँक पातळीवर थकीत कर्जाची १०० टक्के तरतूद झालेली असल्याने कर्जाचा तत्काळ भरणा करावा. अन्यथा, बँकेचा ५२ कोटींचा तोटा व तरतुदी भरुन काढण्यासाठी संस्थेची अस्तित्वात असलेली मालमत्ता विक्री करण्याशिवाय बँकेला दुसरा पर्याय नाही, असा इशारा देत श्री. कदमबांडे यांनी याप्रश्‍नी राज्य शासन व नाबार्ड कार्यालयाकडून सतत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

बँकेच्या प्रगतीची कामगिरी

बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ९७२ कोटींचा नक्त नफा झाला. बँकेस सहा वर्षांपासून ‘ब’ ऑडीट वर्ग मिळत आहे. ‘अ’ ऑडीट वर्ग मिळण्यासाठी नियोजन सुरू आहे. रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार नऊ टक्के भांडवल पर्याप्तता राखणे आवश्‍यक असताना ती जिल्हा बँकेने २२.०१ टक्के राखल्याने १३ टक्के अधिक उत्कृष्ट कामकाज झाले आहे. मागील तीन वर्षांत १६ हजार ८६३ लाभार्थ्यांना १३ कोटी २१ लाख प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत बचत खात्यात जमा करुन सभासदांना लाभ दिला. बँकेचे बारा एटीएम सेंटर असून तीन नवीन सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र एटीएम मोबाईल व्हॅन आहेत. बचत गटांना सहा लाखांपर्यंतच्या मर्यादेत कर्ज पुरवठा होत आहे, असे अध्यक्ष कदमबांडे यांनी नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक ए. एम. सिसोदे, व्यवस्थापक जे. यू. भामरे, सरव्यवस्थापक जी. एन. पाटील, व्यवस्थापक पी. बी. वाघ, सहाय्यक व्यवस्थापक डी. एन. पाटील यांनी अहवाल वाचन केले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com