राज ठाकरे फसले; मशीदीवरील भोंगे उतरवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच नाही!

सर्वोच्च न्यायालयाच्या मुळ आदेशात ध्वनी प्रदुषणाचे निकष सर्वांसाठी!
Raj Thakrey & Mosque
Raj Thakrey & MosqueSarkarnama

नाशिक : गेले काही दिवस राज्यातील धार्मिक तेढ व वातावरण तापविण्यासाठी मशीदीवरील (Mosque) भोंगे काढण्याचा विषय चर्चेत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Suppreme Court) २००५ मध्ये मशीदीवर भोंगे लाऊ नये असा आदेशच दिलेला नाही. मुळ आदेश ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या तीव्रते विषयी आहे. तो सर्वांनाच लागू आहे. त्यामुळे वातावरण पेटविणारे राज ठाकरे (Raj Thakrey) या विषयावर स्वतःच फसले आहेत.

Raj Thakrey & Mosque
आरटीओचा देवरी चेकपोस्ट ठरला लुबाडणुकीचा अड्डा, परिवहन मंत्री लक्ष देतील का?

`मनसे`प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ३ मे पर्यंत मशीदींवर भोंगे काढावेत असा अल्टीमेटम दिला होता. प्रत्यक्षात १८ जुलै २००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात मशीदींवरील भोंगे काढावेत किंवा अजान देऊ नये असे म्हटलेलेच नाही. हा आदेश पुर्णतः ध्वनीप्रदुषणाशी निगडीत आहे. तो सर्वांनाच लागू होते. त्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने ध्वनी तीव्रता किती असावी याबाबत रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक असे भिन्न झोन केले आहेत. त्यानुसार त्या त्या झोनमध्ये ध्वनी तीव्रता किती असावी याचे बंधन आहे. तो सर्वांनाच लागू होतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मशीदीवर भोंगे लावू नयेत असा आदेशच दिलेला नाही.

Raj Thakrey & Mosque
तोळामासाची काँग्रेस सत्यजित देशमुखांना कोणत्या पदाचा शब्द देणार?

यासंदर्भात नाशिक पोलिस आयुक्तांनी याबाबत विशेष आदेश काढले आहेत. यासंदर्भात नुकतेच मनसेने आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशीदीवरील भोंगे काढावेत असे अल्टीमेटम दिले आहे. त्याचे पालन करावे असे म्हटले आहे.

यासंदर्भात १६ एप्रिल रोजी शहरातील सुन्नी मरकज सीरत कमिटीतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन मशीदीतून पहाटे ५, दुपारी १.१५, सायंकाळी ५.१५, संध्याकाळी ६.३० आणि रात्री ८.३० वाजता प्रार्थनेसाठी (नमाज) अजान देण्याची धार्मिक परंपरा आहे. त्याचे पालन अनेक वर्षे केले जाते. ते सुरु ठेवले जावे. त्यात कोणतिही बाधा येऊ नये अशी विनंती केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेला धार्मिक तेढ व वादाच्या विषयाला नाशिकमधूनच नेमके मार्गदर्शन करण्याबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा लाभ गृह विभागाला, पोलिसांना आणि राजकीय पक्षांना देखील होणार आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com