राज यांनी आदित्य ठाकरेंचा हात धरून अयोध्येला जावे!

दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत टिका केली.
Raj Thakre & Deepali Sayyad
Raj Thakre & Deepali SayyadSarkarnama

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांच्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्याच सहकारी पक्षांनी अडथळे आणले आहेत. त्यामुळे त्यांना अयोध्येला जायचे असेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंचा (Aditya Thakre) हात धरून त्यांच्या सोबत जावे, असा चिमटा शिवसेना (Shivsena) नेत्या व अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी राज ठाकरेंना काढला आहे. (If Raj Thakre apologies then where is `that` Thakre)

Raj Thakre & Deepali Sayyad
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळं भाजपच्या अडचणी वाढणार?

दिपाली सय्यद यांनी विविध विषयांवर सुशांत सावंत यांच्याशी त्यांनी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत त्या म्हणाल्या, कांचन गिरी म्हटल्या प्रमाणे खेद व्यक्त केला तर मग `ते` राज ठाकरे कुठे गेले आहेत?. मनसे ही भाजपचीच टीम आहे. या काळात त्यांनी कुठले मुद्दे घेतले आहेत, ते विचारात घेतल्यास ते लक्षात येते. मात्र महाविकास आघाडी ज्या पद्धतीने कामकरीत आहे हे लोकांनी पाहिले आहे. महाविकास आघाडी कुठे तरी चांगले काम करते आहे म्हणूनच हे सर्व सुरू आहे.

Raj Thakre & Deepali Sayyad
मनसे नेत्यांना अटक करणारी महिला पोलिस लाच घेताना अटक!

राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जात आहेत. त्यांनी क्षमा मागितली तर त्यांना जाऊ दिले जाईल. राज ठाकरे यांचे नेतृत्व दोन तालुक्या पुरते आहे. तीथेही शिवसेनेचा आजही दबदबा आहे. अद्याप बाबरी मशीद कोणी विसरलेले नाही. त्यामुळे जर राज ठाकरे तिथे गेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला तर तुम्ही जबाबदार घेणार आहात का?. काही वर्षांपूर्वी तुम्ही यूपीच्या लोकांना महाराष्ट्राबाहेर काढले. त्यामुळे प्रतिक्रीया नैसर्गिक आहे. त्यामुळे तुम्ही आदित्य ठाकरे यांचा हात पकडा आणि अयोध्येला जा, असे सय्यद म्हणाल्या.

खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या हनुमान चालीसा विषयीच्या वादाबाबत त्या म्हणाल्या, राणा बाई आधी औरंगाबादमध्ये होत्या आणि त्या आता मुंबईत आल्या आहेत. मुंबईत आलो की आम्ही जगात पोहोचतो म्हणून त्या असे विषय त्या घेऊन आल्यात. मला वाटते त्या `ईडी`च्या भीतीने ते आता यूपीचे कौतुक करत असावेत.

हनुमान चालीसा आणि संबंधीत वादाबाबत त्या म्हणाल्या, मी हिंदू आहे म्हणून का सांगावं लागतं. या विषयावर विरोधक सतत बरळत असतात. मी वेगवेगळ्या नावाने कधीही निवडणूक लढवली नाही. माझे आधार कार्ड देखील सय्यद आहे, असे त्यांनी सांगितले.

केतकी चितळे आणि तीने शरद पवार यांच्याविषयी केलेल्या ट्वीट विषयी त्या म्हणाल्या, केतकी ही अशी व्यक्ती आहे की, तिला काही तरी आजारपण आहे. कलाकार म्हणून तिने वक्तव्य केलेले नाही. तीला शिक्षा झाली हे बरोबरच आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com