राज ठाकरे, सन्मानाने उत्तर भारतीयांची माफी मागा!

भाजप खासदार साक्षी महाराजांचा राज ठाकरेंना सल्ला.
MP Sakshi Maharaj & Raj Thakre
MP Sakshi Maharaj & Raj ThakreSarkarnama

मालेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज ठाकरे (Raj Thakre) यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषा वापरली आहे. जी त्यांना शोभा देत नाही. त्यांचा अंतरआत्मादेखील हे सांगत असेल. त्याच हेतूने त्यांनी सन्मानाने उत्तर भारतीयांची क्षमा मागावी, असा सल्ला भाजपचे (BJP) खासदार साक्षी महाराज (MP Sakshi Maharaj) यांनी दिला. ( Sakshi Maharaj said Raj Thakre used unparliamentary language for north indians)

MP Sakshi Maharaj & Raj Thakre
सत्तेत असताना ५ वर्षे तुम्ही झोपला होता का?

ते म्हणाले, भारत जगातील सर्वांत मोठे लोकतांत्रिक राष्ट्र आहे. देशातील प्रत्येक हिंदू, मुस्लि, शीख, इसाई यांसह दलित, लहान, मोठा प्रत्येक जाती, धर्माच्या नागरिकाला अटक से कटक व काश्‍मिर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. देशभरात कोणतीही व्यक्ती कोठेही येऊ-जाऊ शकते. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय नागरिकांबाबत जे केले ते अयोग्य होते. हे त्यांनी मान्य करावे. म्हणजे त्यांना देखील अयोध्येला जाता येईल.

MP Sakshi Maharaj & Raj Thakre
तक्रारी असतील तर थेट माझ्याकडे करा!

खासदार साक्षी महाराज खासगी दौऱ्यावर शहरातील महेशनगर भागातील मतीन खॉँ, समीर शेख यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की हिंदू-मुस्लिम वाद निरर्थक आहे. हा वाद केव्हाच संपला असून, आता फक्त राष्ट्रवादाला साथ आहे. पंतप्रधान मोदी यांचा ‘सब का साथ सबका विकास’ या माध्यमातून मुस्लिम समाज मोठ्या संख्येने भाजपशी जोडला गेला आहे. मी स्वत: आज मतीन खॉं व समीर शेख यांच्या निमंत्रणावरुन मुस्लिम कुटुंबाच्या भेटीसाठी मालेगावला आलो आहे.

वाराणसीत हिंदू-मुस्लिम वाद नाही. हा वाद आक्रमणकर्ते (आक्रांता) व देशाचा आहे. देशावर आक्रमण करणारे सर्वांचे दुश्‍मनच होते. देश आहे तर आपण आहोत. त्यामुळे आम्ही राष्ट्राची राजनीती करतो. देशातील १३२ कोटी जनता आमची आहे. सर्वांनी प्रेम व सौदार्हाने राहणे गरजेचे आहे. खासगी दौऱ्यावर आलेल्या साक्षी महाराजांचे शेख कुटुंबीय व भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शेख कुटुंबियांकडे चहा, नाश्‍ता घेतल्यानंतर ते रवाना झाले.

खासदार साक्षी महाराज यांनी शहरात आल्यानंतर शेरो शायरीतून आपल्या स्वभावाची प्रचिती दिली. महाराष्ट्राशी माझे निकटचे संबंध आहे. हे सांगताना त्यांनी मुंबई, नाशिक व त्र्यंबकेश्‍वर येथे माझे आश्रम आहे. माझी प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘मरे करीब आवो तो शायद जान सके मुझे’, माझ्या जवळ आलेला कायमचा माझा होतो. हिंदू-मुस्लीम सलोख्यावर बोलताना त्यांनी प्यार-मोहब्बत जज्बात कभी रुठा नही करते, रिश्‍ते है जन्मो के कभी टुटा नही करते । हा शेर सुनावला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in