राज ठाकरे भोंग्यांचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने मांडत आहेत!

ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांनी आम्ही उपहिंदू आहोत असा दावा केला.
राज ठाकरे भोंग्यांचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने मांडत आहेत!
Haribhau RathodSarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते राज ठाकरे (Raj Thakre) आपला मुद्दा चुकीच्या रितीने मांडत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) आणि राज ठाकरे दोघेही हिंदूत्वाचाच मुद्दा मांडत आहेत. मात्र दोघेही एकमेकांचे हिंदूत्व (Hindutva) चुकीचे असल्याचे सागंत आहेत. जनतेने यातील काय खरे मानावे, असे प्रश्न भटके विमुक्त समाजाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.

Haribhau Rathod
आरक्षण काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात एक होऊन लढा!

श्री. राठोड म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जो मुद्दा आहे, तो चागंला आहे. बरोबर मुद्दा आहे. बरोबर मुद्दा यासाठी आहे, की भोंग्यांचा त्रास होतो ते बरोबर आहे. मात्र त्यासाठी या प्रकारे विषय पुढे नेणे हे योग्य नाही. त्या पध्दतीने लोकांपुढे हा विषय मांडणे हे देखील चुकीचे आहे. तुम्हाला हे मुद्दे पुढे आणायचे आहे किंवा उचलायचे आहे तर तुम्ही सरकारकडे रितस अर्ज करा. त्यातून तो सोडविण्याचा प्रय्तन करणे हेच योग्य आहे.

Haribhau Rathod
राज ठाकरे औरंगाबादच्या सभेनंतर सलीम शेख यांच्या घरी भेट देणार

ते पुढे म्हणाले, तुम्ही हिंदूत्वाचा मुद्दा आहे, तो पुढे नेत आहात. त्यात दोघेही भाऊ वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. एक भाऊ म्हणतो, त्यांचे हिंदूत्व बोगस आहे. यामध्ये आमच्या सारख्या लोकांच्या मनात विचार येतो, की आम्ही काय करायचे. मी लहान असताना, चौथी इयत्तेत शिकत होतो. तेव्हा मला प्रवेश अर्जात लिहायचे होते. जात, धर्म वगैरे. तेव्हा मी आईला विचारले. आपला धर्म कोणता आहे. तेव्हा माझी आई म्हणाली होती, की आपण मुस्लीम नाही आहोत. मात्र हिंदू सारखे आहोत.

ते म्हणाले, मी सतत विचार करीत असतो की, खरोखर आम्ही हिंदू आहोत का?. की आम्ही उपहिंदू आहोत. मला हे सगळ्यांना आवर्जुन सांगायचे आहे. बौध्द, मागासवर्गीय, भटके, आदिवासी, मागासवर्गीय हे सगळे आम्ही उपहिंदू आहोत.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.