`राज ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली`

राज ठाकरेंच्या एका विचाराने महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेऊन ठेवलं. राष्ट्रवादी महिला काँग्रेस
Anita Bhamre & Raj Thackray
Anita Bhamre & Raj ThackraySarkarnama

नाशिक : अंधेरी पूर्व (Andheri East by election) विधानसभेच्या पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena Uddhav Thackray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांच्या विरोधात भाजपने (BJP) उमेदवार उभा करू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) यांना राज ठाकरे (Raj Thackray) यांनी पत्राव्दारे केले. त्यांच्या या विचाराने पूरोगामी महाराष्ट्राला (Maharashtra Politics) एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेस (NCP) शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी म्हटले आहे. (NCP city president Anita Bhamre welcomes Raj Thackray Appeal)

Anita Bhamre & Raj Thackray
नंदुरबार जिल्हा परिषदेची सत्ता भाजप हिसकावणार का?

त्या म्हणाल्या, गेल्या अडीच तीन वर्षांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून राज्यातील राजकारणाने अतिशय हीन दर्जाची पातळी गाठलेली दिसते.

Anita Bhamre & Raj Thackray
गद्दारांनी बाळासाहेबांच्या फोटोशिवाय लढून दाखवावे!

आता शिंदे फडणवीस सरकार तीन महिन्यांपासून राज्यात आहे. राजकीय पक्षांमधील नेते रोजच एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतात. यात कुटुंबांतील महिला सदस्यांवर देखील खालच्या दर्जाची टीका दोन्ही बाजूंकडून होते. कधी कधी तर सामान्य माणसाच्या मनाला प्रश्न पडतो की आपण ह्या लोकप्रतिनिधींना निवडून देऊन चूक तर नाही केली.

प्रत्येक राजकीय पक्षाची स्थापना चांगले विचार आणि ध्येय धोरणानुसार होते, परंतू कालांतराने चुकीच्या लोकांच्या हाती पक्षाचे नेतृत्व गेले की हमखास पक्ष आणि कार्यकर्ते नाहक बदनाम होतात. शिवसेनेच्या काळात शाखा प्रमुखापासून आमदार पदावर पोहोचलेले (स्व.) रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रृतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेनेकडून उमेदवारी दिली आहे. भाजपने विरोधात मुरजी पटेल यांना उभे केले आहे.

निवडणूकीत कोण उमेदवार निवडून येईल हे नंतर. पण त्याआधीच मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांनी (स्व.) रमेश लटके यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहून `राज ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली. `ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने उमेदवार देऊ नये अशी विनंती केली आहे. या एकाच विचाराने राज ठाकरेंनी कोट्यवधी महिलांच्या मनाचा ठाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी महिलांविषयी घेतलेल्या या सह्रदय निर्णयाचे राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिकच्या वतीने आभार.

सत्ता येत जात असते परंतू पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण हे नेहमीच सभ्य आणि सुसंस्कृत असणे मराठी माणसाला अभिप्रेत आहे. उद्या माघारीच्या दिवशी शेवटी निर्णय भाजप घेईल पण त्याआधीच राज ठाकरेंनी ही निवडणूक एकहाती जिंकली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com