एसटी संपाबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

एसटीचे एक लाख कर्मचारी आहेत, उद्या अंगावर आले तर काय कराल? याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली पाहिजे. लोकांनी राज्याच्या कारभार तुमच्या हातात दिला आहे.
Raj Thackeray, uddhav thackeray

Raj Thackeray, uddhav thackeray

sarkarnama

नाशिक : एसटी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास प्रशासनाने सांगितले आहे. अन्यथा निंलबन अटळ असल्याचा शेवटचा अल्टिमेटम परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, ''राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा करीत आहेत. चार महिने पगार न घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावू अशी भाषा सरकारनं वापरणं योग्य नाही.

एसटीचे एक लाख कर्मचारी आहेत, उद्या अंगावर आले तर काय कराल? याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली पाहिजे. S.T कर्मचारी युनियन बाजूला सारून संप करीत आहेत. लोकांनी राज्याच्या कारभार तुमच्या हातात दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी (cm uddhav thackeray) याबाबत बोलणे आवश्यक आहे,''

<div class="paragraphs"><p>Raj Thackeray, uddhav thackeray</p></div>
'म्हाडा'प्रकरणी आव्हाडांच्या घरासमोर अभाविपचा राडा ; राष्ट्रवादीही आक्रमक

''खासगीकरण करण्यापेक्षा एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा, ते तुम्ही करणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आणि अरेरावीची भाषा करणार. लोकांसाठी राज्य असतं, त्यांच्याशी अरेरावीची भाषा बोलण्यासाठी नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत? त्यांचं म्हणणं काय आहे ? ते समजून घेतलं पाहिजे. अरेरावीची भाषा, मेस्मा लावण्याची भाषा केली जाते आहे. ही भाषा मुळीच योग्य नाही, जोपर्यंत एसटी मधील भ्रष्ट्राचार थांबत नाही तोपर्यंत उन्नती शक्य नाही,'' असे राज ठाकरे म्हणाले एसटीच्या संपाबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिणार आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं त्यांनी सांगितलं.

कॉग्रेसशी युतीबाबत राऊत म्हणाले, 'आम्हाला गरज नाही, स्वबळावर लढणार''

मुंबई : ''आम्हाला कोणाच्या युतीची गरज नाही. जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी गोव्यात निवडणूक (goa election)लढवू शकतात तर महाराष्ट्र का नाही. महाराष्ट्र बाजूलाच आहे. आमची मोर्चेबांधणी देखील उत्तम आहे. त्यामुळे गोव्याची निवडणूक पूर्ण ताकदीन लढणार,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

पुढील वर्षी गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्राप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल का? या प्रश्नाला उत्तर राऊतांनी दिले. संजय राऊत म्हणाले, ''गोव्यातील काँग्रेस आणि शिवसेनाबाबतच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा सुरु आहे. माझी काँग्रेसमधील काही लोकांशी चर्चा सुरु आहे. पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ज्या राज्यात अशाप्रकारच्या आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करायला लागते. ती प्रकिया तशी मोठी आहे. जर आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. पंरतु ते तयार झाले नाहीतर आम्ही गोव्यात २२ जागांवर स्वतंत्र लढू,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com