Raj Thackeray : अडचण घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना राज ठाकरेंनी खडसावले; म्हणाले...

Nashik Tour : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणार
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray Meets Farmers : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. दरम्यान, रविवारी (ता. २१) सकाळी भेटायला आलेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अवकाळी पावसाने झालेले नुकसान, जिल्हा बँकेची वसुली, कांद्याचे दरातील घसरण, नुकसान भरपाई आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे अडचणींचा पाढाच वाचला. त्यावर राज ठाकरे यांनी काही प्रतिप्रश्न करून शेतकऱ्यांची कानउघडणी केली.

Raj Thackeray
Anil Deshmukh News : तुरुंगाबाहेर आलेल्या अनिल देशमुखांनी पहिल्याच निवडणुकीत बाजी मारली : नरखेड ‘खरेदी विक्री’वर राष्ट्रवादीचा झेंडा

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राज्यभरात कुठेही असलेल्या सभेला तुफान गर्दी असते. सभांना गर्दी असली तरी निवडणुकीत त्यांना अपेक्षित मतदान होत नाही, असे वेळोवेळी दिसून आले आहे. हाच मुद्द्या पुढे करून विरोधकही मनसेवर (MNS) टीका करत असतात. हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी अडचण घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न करत चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांना एकत्र येऊन हा लढा उभारण्याची गरज असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, "तुम्ही मला मतदान करत नाही. अडचणीच्या काळात मग माझ्याकडे का येता? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. याचे भान तुम्ही ठेवायला हवे. त्यांना मतदान करून पुन्हा पाच वर्षे टाहो फोडता. पुन्हा निवडणुका आल्या की त्यांनांच मतदान करता. मग कशासाठा हा खेळ खेळतोय आपण? " यावेळी शेतकऱ्यांना यापुढे तुमच्यासोबतच राहू असे सांगितले. यानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्याशी चर्चा करतो, असेही अश्वासन दिले.

Raj Thackeray
Savitribai Phule Pune University : 'या' पाच जणांमधून कोण होणार पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू?

राज ठाकरे म्हणाले, तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची (Eknath Shinde) पुन्हा एकदा वेळ घेतो. तुमच्यातील पाच-सहा जण माझ्याबरोबर या. आपण सर्वजण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून काय तो तोडगा काढू. यानंतर आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे यांना चाबूक भेट दिला. त्यावेळीही त्यांनी शेतकऱ्यांना दुसऱ्यांना मतदान केले तर चाबकानेच मारेन, अशी मिश्किल टिपण्णी केली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांत हशा पिकला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com