Raj thackeray On Shadow Cabinet : मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पुढं काय झालं? राज ठाकरे म्हणाले..

Raj Thackeray News : दोन वर्ष कामच करता आलं नाही कारण..
Raj thackeray On Shadow Cabinet :
Raj thackeray On Shadow Cabinet : Sarkarnama

Raj thackeray On Shadow Cabinet : राज्यात २०१९ मध्ये शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांनी एकत्र राजकीय समीकरण घडवत महाविकास आघाडीचे सरकार बनवले होते. तत्कालीन सरकारच्या सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली होती.

मनसेचा एक विशिष्ट नेता, एका विशिष्ट सरकारच्या खात्यावर लक्ष ठेवणार असे जाहीर केले होते. प्रत्येक खात्यात कारभार व्यवस्थित चाललंय ना? आणि घोटाळा झाल्यास तो त्याची पोलेखोल करणार, असे मनसेने ठरवले होते.

Raj thackeray On Shadow Cabinet :
Satara News : निवडणुकीसाठीच भाजपचा नोटाबंदीचा फंडा : शशिकांत शिंदे

शॅडो कॅबिनेट काही उठावदर्शक कामगिरी दिसून आली नाही. यावरच त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'आता सद्य परिस्थितीत शॅडो कॅबिनेट आता कार्यरत आहे की नाही? याबाबत लोकांना शंका आहे.' यावर राज ठाकरे यांनी स्वत: माहिती दिली. राज ठाकरे यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना, पत्रकार परिषद घेतली.

शॅडो कॅबिनेटचं पढे काय झालं? ती तुमची कॅबिनेट फक्त महाविकास आघाडी सरकारलाच घेरण्यासाठी होती का? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला. यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरे म्हणाले. "या सरकारसाठी वेगळी शॅडो कॅबिनेट आणि त्या सरकारसाठी वेगळी, असं काहीही नाही. जसं आम्ही शॅडो कॅबिनेट जाहीर केला, लगेच महिन्याभरात लॉकडाऊन लागलं. त्यामुळे कोरोनाकाळात दोन वर्ष कॅबिनेटचं काम करता आलं नाही. मात्र आता ती कार्यरत केले जाणार आहे," अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. यामुळे आता सरकारच्या विविध मंत्रालयावर पुन्हा देखरेख करण्यासाठी पुन्हा शॅडो कॅबिनेटचं काम सुरू होणार असल्याचे संकते त्यांनी दिले.

राज ठाकरे आज आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा दौरा करत आहेत. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते आज चर्चा करत आहेत. नाशिकमधील मनचसेचं गतवैभव पक्षाला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आणि पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी राज ठाकरे जोरदार प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये जे काही काम आम्ही केलं, तेवंढं काम यापूर्वी कुणीही करू शकले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj thackeray On Shadow Cabinet :
Daryapur APMC News : कॉंग्रेस श्रेष्ठींनी बंद लिफाफ्यात पाठवली नावे, सभापतिपदी गावंडे !

राज ठाकरे आज आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा दौरा करत आहेत. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते आज चर्चा करत आहेत. नाशिकमधील मनचसेचं गतवैभव पक्षाला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आणि पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी राज ठाकरे जोरदार प्रयत्न करत आहेत. नाशिकमध्ये जे काही काम आम्ही केलं, तेवंढं काम यापूर्वी कुणीही करू शकले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com