Rainfall: अतिवृष्टीबाधिताना एकरी ५० हजार नुकसानभरपाई द्या!

राज्य शासनाच्या धोरणांच्या विरोधात बुधवारी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येवला येथे आंदोलन करण्यात आले.
NCP delegation at Yeola
NCP delegation at YeolaSarkarnama

येवला : अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे असून, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या (Farmers suicide) वाढल्या असल्याने नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना ५० हजार रुपये एकरी नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारने (State Government) मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) करण्यात आली. वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला जाणे म्हणजे राज्य सरकारचे अपयश असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. (NCP deemands compensation for rainaffected farmers)

NCP delegation at Yeola
एकनाथ शिंदे अन् त्यांनी फोडलेल्या नगरसेवकांचा फैसला एकाच दिवशी?

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी येथील तहसील कार्यालयाबाहेर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले.

NCP delegation at Yeola
NCP News: एकनाथ शिंदे सरकारने महाराष्ट्राला धोका दिला

निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रात लाखो कोटींचा उद्योग सुरू करून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याचे वृत्त म्हणजे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे. याचा निदर्शने आंदोलन करून आम्ही निषेध करत असून, केंद्र सरकारकडे मध्यस्थी करून हा प्रकल्प महाराष्ट्रातच आणावा. लम्पी आजारामुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडत असून त्यांना सरकारने त्वरित नुकसानभरपाई द्यावी तसेच या आजाराची लस सरकारतर्फ मोफत उपलब्ध करून द्यावी. जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील सर्व कामे व पावसाळ्यातील कामे बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या सर्व कामांची स्थगिती तत्काळ उठवावी व त्वरित पालकमंत्री नियुक्त करून जिल्ह्यातील सार्वजनिक कामांना सुरवात करावी.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, राधाकिसन सोनवणे, युवानेते संजय बनकर, शहराध्यक्ष दीपक लोणारी, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, सचिन सोनवणे, मकरंद सोनवणे, धनराज पालवे, भाऊसाहेब कळसकर, अजीज शेख, तुळशीराम कोकाटे, अर्जुन कोकाटे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com