रेल्वे, विमाने गेली, आता `बीएसएनएल`तरी वाचवा!

छगन भुजबळ यांनी केंद्राच्या खाजगीकरण धोरणावर चिमटा घेतला.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : रेल्वे गेली, विमानेही गेली. आता `बीएसएनएल`ची (BSNL) बारी आली. ते कधी विकतील याचा नेम नाही. केंद्राच्या (Centre Government) कृपादृष्टीशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे किमान `बीएसएनएल`ला तरी वाचवायला हवे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

Chhagan Bhujbal
`मला राज्यपालांच्या विचारांची कीव येते`

येथील सुविचार मंचतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील व श्री. भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या खास शैलीत भाषण करतांना पालकमंत्री भुजबळ यांनी दूरसंचार क्षेत्र आणि पोलीस आयुक्तांवर कोटी केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या नितीन महाजन यांनी नाशिक दूरसंचार देशात एक क्रमांकावर आणले आहे. मात्र केंद्र सरकारने रेल्वे, विमान कंपनीचे खासगीकरण केले. अगदी अलीकडेच विमान कंपनीही गेली. त्यामुळे ते दूरसंचारही केव्हा विकतील, याचा नेम नाही असा टोला हाणला.

Chhagan Bhujbal
एकनाथ खडसे माझ्यापेक्षा सिनीअर नाहीत!

ते पुढे म्हणाले, अर्थात दिल्लीकरांची कृपादृष्टी असल्याशिवाय ते शक्य नाही ही भावना तिथपर्यंत पोहचवा असेही ते म्हणाले. तर दररोज गोदावरीत स्नान करणारया आयुक्तांना गोदा प्रदुषणमुक्त करण्यासाठी हातभार लावा अन रामकुंडात स्नान करा.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अविचार न करता सुविचार करा असा संदेश देत ‘सुविचार मंच’ नाशिक ही सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारी संस्था असून लोकमनाच्या सुखदु:खात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार देण्याचे काम करत आहे.संस्थेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी काम करत असून आकाश पगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी युवक गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी ‘देव द्या देवपण घ्या’ हा अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम राबवीत आहे.ही अतिशय गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार दीपिका चव्हाण, सुविचार मंचचे अध्यक्ष अॅड. अशोक खुटाडे, सचिव ॲड. रवींद्र पगार आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com