Rahuri Bazar Samiti : राहुरीत विखे-कर्डिलेंना प्राजक्त तनपुरेंचा जोरदार दणका : बाजार समितीत 16 जागांवर दणदणीत विजय

Prajakt Tanpure : राहुरी बाजार समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता
Apmc Election Rahuri
Apmc Election Rahuri Sarkarnama

Ahmednagar News : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अनेक ठिकाणांचे निकालांचा कलही समोर आला आहे. अहमदनगरच्या राहुरी बाजार समितीचाही निकाल समोर आला असून राहुरी बाजार समितीवर पुन्हा एकदा माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीच बाजी मारली आहे.

राहुरी बाजार समितीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. तर भाजपचे खासदार सुजय विखे यांना मोठा धक्का बसला आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 99 टक्के मतदान झालं. त्यानंतर 18 जागांसाठी 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्या गटाविरूद्ध खासदार सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले यांच्या गटात मुख्य लढत होती.

मात्र, मतमोजणीनंतर प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने बाजी मारली. प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने या निवडणुकीत 18 पैकी 16 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तनपुरे यांच्या गटाने विखे आणि शिवाजी कर्डिले गटाचा पराभव केला. गेल्या 20 वर्षांपासून तनपुरे यांच्या गटाची राहुरी बाजार समितीवर एकहाती सत्ता असून या निवडणुकीतही ती कायम राहिली.

दरम्यान, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खासदार सुजय विखे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रतिष्ठेची केली होती. प्राजक्त तनपुरेंच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्याचा चंग सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले यांनी बांधला होता. मात्र, अखेर प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने तब्बल सोळा जागा जिंकल्या आहेत. तर विखे आणि कर्डिले गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com