भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन ऐतिहासीक क्षणांचे साक्षिदार व्हा!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाजाला यात्रेशी जोडून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
Congress Meeting
Congress Meeting Sarkarnama

नाशिक : भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) तीन प्रकारचे यात्री सहभागी आहेत. त्यात भारत यात्री, (National) राज्य यात्री (State) आणि जिल्हा यात्री, (District) अशा तीन विभाग केले आहेत. त्यानुसार नेते, कार्यकर्ते यात्रेत (Party workers) सहभागी होत आहेत. यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यात जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती (Congress) विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिकचे (Nashik) काँग्रेस निरीक्षक प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी केले. (Congress leader take a meeting of party workers for Bharat Jodo Yatra)

Congress Meeting
राज्य सरकार महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करते!

जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाची बैठक महात्मा गांधी रस्त्यावरील कॉंग्रेस भवनात श्री. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

Congress Meeting
HMV : रोहित पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर : सांगितलं 'एचएमव्ही'चा फुलफॉर्म!

या बैठकीत मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजंली अर्पण करण्यात आली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल यांच्या अभिनंदनचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला.

श्री. पवार यांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी अनुसूचित जाती विभागाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतीलच, पण समाजवादी विचारसरणीच्या लोकांना सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्षांनी करावे, अशा सूचना केल्या. सुरेश मारु, रमेश साळवे, कुसुम चव्हाण, सुभाष हिरे, राजेश लोखंडे, मिलिंद हांडोरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

बैठकीला हनिफ बशीर, इशाक कुरेशी, उमाकांत गवळी, अरुण दोंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्युली डिसूजा, ॲड. मीना वाघ, माया काळे, सारीका किर, पवारताई, अमोल मरसाळे, विलासराज बागूल, सुभाष हिरे, अशोक शेंडगे, पवन जगताप, राजेश लोखंडे, आनंद संसारी, प्रकाश पंडित, रूपचंद साळवे, गोरख साळवे, संजय खैरनार, प्रकाश उबाळे, दिलीप अंबापुरे, भिवसेन साळवे, नंदू साळवे, ॲड. विकास पाथरे, शिवाजी बर्डे, श्रावण बोडके, संजय जाधव यांच्यासह तालुकाध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मनोहर अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रकाश खळे यांनी आभार मानले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in