
Ahmednagar News: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ताब्यात असलेल्या प्रवरानगर येथील साखर कारखान्यात तब्बल १९१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाने केला आहे. त्यामुळे विखे-पाटील यांच्या अधिपत्याखालील हा सहकारी साखर कारखाना वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्यामध्ये कर्ज व्यवहार करताना बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून कारखान्यामधील नफा आणि तोट्यात फेरबदल करण्यात आले असल्याचे प्रवरा शेतकरी मंडळाने म्हटले आहे.
त्यामुळे ही कारखान्याला ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी फसवणूक असून याबाबत अनेकदा तक्रारी देखील करण्यात आल्या. मात्र, या संदर्भाने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत साखर संचालकांना देखील खुलासा मागवण्यात आला होता, पण कारखान्याने खुलासा दिला नाही. त्यामुळे या कारखान्याला कर्ज देणं बंद करावे, अशी मागणी प्रवरा शेतकरी मंडळाने नगर जिल्हा बँकेकडे केली आहे.
दरम्यान, प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी या घोटाळ्याबाबत नगर जिल्हा बँक आणि साखर संचालकांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे-पाटलांचा कारखाना अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Edited By- Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.