कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या होम आयसोलेशन किटमध्ये काय असेल?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात तयारीची माहितीदिली.
Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh TopeSarkarnama

मुंबई : कोरोनाग्रस्त (Covid19) रुग्णाचा क्वारंटाईन कालावधी राज्यात (Maharashtra) सगळीकडे सात दिवसांचाच राहील. कुठेही त्यात बदल नसेल.त्यात काहीही बदल करता येणार नाही, अशा सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

Health Minister Rajesh Tope
महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करणार!

कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर होम आयसोलेशन कीटस् तयार केल्या पाहिजेत. जे लोक होम आयसोलेटेड आहेत किंवा जे पॅाझिटीव्ह लोक घरीच उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझर, माहिती पुस्तिका, दहा मास्क, दहा पॅरासिटॅमॅाल गोळ्या, वीस मल्टी व्हीटॅमीनच्या गोळ्या असे होम आयसोलेशन किटस् देण्याची व्यवस्था करीत आहोत.

Health Minister Rajesh Tope
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा झटका; महामंडळाने थेट केलं बडतर्फ

ते म्हणाले, जे लोक पॅाझिटीव्ह असुन घरी उपचार घेत आहेत, त्यांना दहा दिवसांत कॅाल सेटर्समधून किमान तीन कॅाल्स जावेत अशी आमची अपेक्षा आहे. त्यात पहिला दिवस, पाचवा दिवस आणि सातव्या दिवशी संपर्क व्हावा अशी तयारी केली आहे. रुग्णाची पूर्ण विचारपूस केली जाईल. त्याची सर्व माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. यासंदर्भात जालना येथे त्याची सुरवात केली आहे. राज्याचा डॅशबोर्ड आहे तसाच डॅश बोर्ड जिल्हा स्तरावर असावा. त्यात प्राणवायुची गरज किती, उपलब्धता किती, औषधांची, खाटांची उपलब्धता याची माहिती त्यात दिसावी. जेणे करून लोकांनी पॅनीक होऊ नये हा त्यातील मुख्य उद्देश आहे.

श्री. टोपे यांनी शाळांबाबतच्या निर्णयावर खुलासा केला. ते म्हणाले, काही ठिकाणी शाळांबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये `आयसीएमआर` अर्थात इंडियान कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या महासंचालकांशी चर्चा करून जीथे पॅझिटीव्हीटी रेट दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे तीथे शाळांबाबतचे काही निर्णय घ्यावे लागणार आहे. आपल्या राज्यात हा दर १५.५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे त्यावर निर्बंध घालून लोकांना संसर्गीत होण्यापासून रोखणे हे महत्तवाचे काम आहे. अनेक पालकांना वाटते की मुलांना शाळेत पाठवले पाहिजे, त्याचबरोबर काहींना वाटते शाळेत पाठवू नये. मात्र त्याबाबत दोन तीन आठवड्यांचा हा विषय आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत समजून घ्यावे व त्याचा स्विकार करावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विविध तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com