कोरोनाग्रस्त असुनही मंत्री भारती पवार यांचा कोरोना रोखण्यासाठी लढा!

केंद्र सरकारची यंत्रणा कोरोना विरोधात सर्व मदत करायला तयार
centre Minister Dr Bharti Pawar
centre Minister Dr Bharti PawarSarkarnama

नाशिक : तीन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार (Bharati Pawar) कोरोनाबाधित झाल्या. त्यामुळे सध्या त्या क्वारंटाईन आहेत. कोरोनाबाधित असुनही त्या स्वस्थ न बसता सातत्याने केंद्र व राज्य शासनाच्या (State Government) प्रशासनाला कोरोना (Covid19) प्रसार रोखण्यासाठी सक्रीय करण्यात व्यस्त आहेत.

centre Minister Dr Bharti Pawar
देशात कुठेही झाले नाही ते नाशिककरांनी करून दाखविले!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थीतीचा आढाव घेतला. कोरोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आज आढावा घेतला. पेशंटची संख्या वाढली तर काय काळजी घ्यायला हवी तसेच त्या त्या राज्यांनी काय निर्णय घ्यावे. आयसीयु बेड्स उपलब्धता याबाबत केंद्राने गाईड लाईन दिल्या होत्या असे भारती पवार म्हणाल्या.

centre Minister Dr Bharti Pawar
एसटीबाबत आपुलकी संपली?; एक होती एसटी... असं होऊ नये!

राज्यात कोविडचे रुग्ण मागच्या काही आठवड्यात वाढत आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण देखील वाढत आहेत. आताच काळजी घेतली तर प्रसार रोखता येईल. यासाठी केंद्र सरकार सातत्याने गाईडलाईन्स देत आहे. हेल्थ सेक्रेटरी सर्व राज्यातील हेल्थ सेक्रेटरीसोबत चर्चा करत आहोत. कोरोनाची सध्याची लाट विचारात घेता केंद्र शासनाने यापूर्वीच विविध सुचना केल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. त्यातूनच हा प्रसार रोखता येईल असा दावा त्यांनी केली.

किट्ससाठी राज्यांना निधी दिला आहे. केंद्राने सर्वच बाबतीत मदत दिलेली आहे. केरळ, महाराष्ट्र येथे रुग्णाची संख्या वाढत आहे. या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईमध्ये संख्या वाढत आहे ही काळजीची गोष्ट आहे. सरकार म्हणतं केंद्र सरकार देत नाही काय देत नाही ते तरी सांगा केंद्रिय मंत्र्यांनी देखील लक्ष दिलेले आहे. आता सर्वांनी सतर्क रहायला हवे असे आवाहन भारती पवार यांनी केली आहे. ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या पळायला हव्यात. हा व्हायरस विरोधातील लढा आहे. राज्यमंत्री भारती पवार यांनी सतर्क राहण्याचे आणि केंद्राकडून हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिेले आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com