ACB Trap: मोठा मासा जाळ्यात अडकला, `पीडब्ल्यूडी`चा अभियंता अटकेत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्यावर कारवाई केली.
ACB
ACB Sarkarnama

Nashik News: सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाचे शहादा (Nandurbar) येथे कार्यरत कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (Mahesh Patil) यांना बांधकाम कंत्राटदाराकडून साडे तीन लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्यावर कारवाई केली. (PWD`s Ex. Engineer trapped by ACB for 3.50 lacs Bribe)

ACB
Nashik News; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस नेत्यांचे थेट आव्हान!

याबाबत नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियंता पाटील वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी करीत होते. त्यामुळे कंत्राटदाराने तक्रार केली. गेले काही दिवस जवळपास रोज लाचखोर सापळ्यात अडकत असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

ACB
Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी गेले सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्हा मार्ग डांबरीकरण व डागडुजीची कामे पुर्ण केली आहेत. सध्या तक्रारदार यांच्या तीन नवीन कामांच्या निवीदा मंजुर होऊन शहादा (धुळे) येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडून आल्या होत्या. मात्र त्याचे कार्यरंभ आदेश देण्यात आले नाही.

कंत्राटदाराने पुर्ण केलेल्या कामांचे 3.92 कोटी रुपयांचे प्रलंबित बील तसेच प्रस्तावित 5.33 कोटींच्या कामांचे कार्यरंभ आदेश मिळावेत यासाठी पाठपुरावा केला. त्याबाबत कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी ती बीले मंजुर केली नाहीत. कार्यारंभ आदेश देखील दिले नाही. या कामांसाठी त्यांनी टक्केवारी म्हणून 43 लाख रुपयांची मागणी केली.

ACB
Devendra Fadanvis; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पुर्नविकासाचा सरकारचा प्रस्ताव!

त्यानंतर कंत्राटदार असलेल्या तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील कार्यालयात साडो तीन लाख रुपये स्विकारताना सापळा लावून अटक करण्यात आले. पोलिस उप अधिक्षक राकेश चौधरी, समाधान वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत कारवाई केली आहे. श्री. पाटील हे नाशिक येथे राहतात. एसीबीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी देखील तपासणी केली आहे. यानिमित्ताने बांधकाम विभागातील मोठा मासा गळाला लागाल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com