`राष्ट्रवादी` युवकच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी पुरुषोत्तम कडलग

पुरषोत्तम कडलग यांच्या नियुक्तीचे नाशिकमध्ये स्वागत
Purshottam Kadlag
Purshottam KadlagSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग (Purshottam Kadlag) यांची संघटनेच्या प्रदेश (Maharashtra) कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे जिल्हा अध्यक्ष असलेल्या कडलग यांच्या नियुक्तीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. (Nashik workers wel come Kadlag`s appointment)

Purshottam Kadlag
खासदार हेमंत गोडसे राजीनामा द्या; पुन्हा निवडून येऊन दाखवा!

कार्यकर्त्यांची फळी उभारत संघटनेला राज्यात प्रथम स्थानावर आणण्यात यश मिळाले. पक्षाच्या अभिप्राय अभियानात राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस संघटनेला मिळवून दिले होते. तसेच पक्ष विरोधात असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात युवा संवाद यात्रा घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्याकडून नियुक्ती मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया श्री. कडलग यांनी व्यक्त केली.

Purshottam Kadlag
Ramdas Athawale : शरद पवारांबाबतचा रामदास कदमांचा दावा आठवलेंनी खोडून काढला!

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र पगार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर यांच्या सूचनेनुसार श्री. कडलग यांची नियुक्ती पक्षाच्या मुंबईतील राष्ट्रवादी भवनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in