`आरटीओ`चे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी लागेबांधे?

एकनाथ खडसे म्हणतात, उत्सवासाठी पैसे दिले जात असल्याने तक्रारी नाही
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : महाराष्ट्र (Maharashtra) व मध्य प्रदेश (Madhy Pradesh) हद्दीवरील पूरनाड चेकनाक्यावर आरटीओच्या (Purnad RTO Checkpost) माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची लूट केली जात आहे. त्या ठिकाणी आपण स्वतः पाहणी केली आहे. मात्र हे सर्वपक्षीय लागेबांधे (बॅरिअर) असल्याचे आपणास दिसून आले आहे. थेट पैसे न देता उत्सवासाठी पैसे दिले जात असल्याने त्याच्या तक्रारी होत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकारांशी बोलताना केला. (Eknath Khadse visits RTO check post of Purnad)

Eknath Khadse
भाजपच्या चित्रा वाघ यांची स्वतंत्र तपास यंत्रणा?

महाराष्ट्र व मध्य प्रदेश हद्यीवरील पूरनाड चेकनाक्यावर होत असलेल्या गैरव्यवहारबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतः जाऊन पाहणी केली होती.

Eknath Khadse
Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

त्याबाबत बोलताना ते म्हणाले, की याबाबत आपण विधानसभेतही प्रश्‍न उपस्थित केला आहे. या चेकनाक्यावरील वाहनात मालाचे वजन जास्त असल्यास त्याला दोन हजार रुपये आकारले जातात. दिवसभरातून सोळाशे वाहने जात असतात दररोज साधारतः पाच ते सात लाख रुपये मिळत असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत आरटीओ कोणतीही कारवाई होत नाही.

आपण पाहणी केली त्या वेळी त्या ठिकाणी गैरप्रकार आढळून आला. मात्र हे सर्वपक्षीय बॅरिअर असल्याचे आपणास दिसून आले आहे. त्यात हे पैसे थेट दिले जात नाही, तर उत्सवासाठी वर्गणी म्हणून हे पैसे दिले जातात. त्यामुळे त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवित नाही, असा आरोपही त्यांनी केला. मात्र आपण पुन्हा याबाबत विधान परिषदेत आवाज उठविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

आमदार मंगेश चव्हाणांनी राजीनामा द्यावा

भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही आरटीओच्या वसुलीबाबत स्टींग ऑपरेशन केले होते. त्यांनी कारवाईची मागणी केली होती. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, आमदार खडसे म्हणाले, आमदार मंगेश चव्हाण हे सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत. त्यांच्याच तक्रारीवर कारवाई होत नसेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मात्र जर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या तक्रारीवरच कारवाई होत नसेल, तर आपण विरोधी पक्षाचे आमदार आहोत. आपले कोण ऐकणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com