Yuvasena: कठपुतली एकनाथ शिंदे राज्याच्या नुकसानीस जबाबदार!

धुळे येथे युवासेनेतर्फे वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
Yuvasena workers agitation
Yuvasena workers agitationSarkarnama

धुळे : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प (Foxcon project) राज्य सरकारच्या (State Government) नाकर्तेपणामुळे गुजरातला (Gujrat) गेला. त्यामुळे महाष्ट्रातील (Maharashtra) युवकांवर अन्याय झाला, असे म्हणत युवासेनेने (Yuvasena) येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली. (Signature drive) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कठपुतली आहे. त्यांनी स्वतःच्या लालसेसाठी सबंध महाराष्ट्राला संकटात ढकलू नये, असा इशारा यावेळी देण्यात आला. (Yuvasena warns state government for loose of foxcon project)

Yuvasena workers agitation
PI Bakale: बकालेंकडून मराठाच नव्हे, अन्य समाजांबद्दलही आक्षेपार्ह टिपणी?

वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारने पूर्ण प्रयत्न केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात हा प्रकल्प जवळजवळ निश्चित झाला असताना, नवीन आलेल्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला.

Yuvasena workers agitation
Eknath Khadse: सत्व, तत्त्व, निष्ठा नसेल तर विकासाची कामे व्यर्थ!

महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करून, लोकशाही पायदळी तुडवून सत्तांतर केले. शिवसेनेसोबत गद्दारी केली आणि आज महाराष्ट्रातील लाखो युवकांसोबतही गद्दारी केली, असा आरोप युवासेनेने केला. शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात रायगडमध्ये प्रस्तावित असलेला साडेतीन हजार कोटींचा बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रात येणारे प्रकल्प सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरातला जात आहे. नाकर्ते सरकार ते थांबविण्याऐवजी राजकारण करण्यात व्यस्त आहे. स्पर्धेत महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक असताना, गुजरात आले कसे, हाही संशोधनाचा भाग असल्याचे युवासेनेने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभरात युवासेनेतर्फे राज्य सरकारच्या निषेधासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. धुळ्यात महात्मा गांधी पुतळ्यासमोर ही मोहीम राबविण्यात आली. युवकांसह ज्येष्ठांनी यात सहभाग घेतला.

युवासेनेचे महाराष्ट्र सहसचिव ॲड. पंकज गोरे, जिल्हाप्रमुख संदीप मुळीक, शहरप्रमुख आकाश शिंदे, देवपूर शहरप्रमुख स्वप्नील सोनवणे, उपशहरप्रमुख प्रेम सोनार, नीलेश चौधरी, संदीप जोगी, राहुल इथापे, मयूर सोंजे, अमोल पटवारी, ज्ञानेश्वर देवरे, जयवंत गोरे, सोनू मुर्तडक, भूषण चौधरी, तेजस मराठे, पवन खांडरे, दर्शन कंबायत, राकेश मराठे, कमलेश जाधव, मनीष सोनवणे, श्रीकांत गायकवाड, विक्की गर्ग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in