महाजन अडचणीत; शिक्षण संस्थेशी संबंधित गुन्ह्यात पाच जणांची चौकशी

जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वाद प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात आहे गुन्हा दाखल.
Girish Mahajan
Girish Mahajansarkarnama

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) संशियत असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेतील गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी निलेश भोईटे, प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्या घराची पोलिसांनी तपासणी केली. त्यासोबतच आणखी तीन जणांच्या घराचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.

कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे ७० जणांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले. पोलिस उपआयुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वात पाच पथके तयार करण्यात आली. त्यानंतर या पथकाकडून स्वंतत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.

Girish Mahajan
भाजपला मोठा धक्का; महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

या पथकाने सकाळपासूनच जळगाव शहरातील विविध ठिकाणी गुन्ह्यातील संशयितांच्या घरी चौकशी सुरु केली. निलेश रणजीत भोईटे, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईटे, नूतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य एल पी देशमुख, प्रमोद काळे या पाचही लोकांच्या घरी पथकाकडून कागदपत्रांच्या चौकशीसह जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

प्रकरण काय?

जळगावमधील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणाचा तपासासाठी आता पुणे पोलिस जळगाव येथे गेले आहेत.

संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस जळगावात दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.

Girish Mahajan
शिवसेना आमदार भाजप खासदाराला म्हणाले, ‘मंत्रिपदासाठी तुमची मोदी-शहांकडे शिफारस करतो’

दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का कारवाईबाबत वक्तव्य केले होते. विजय भास्कर पाटील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे. आपल्याला आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. पुण्यात आल्यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. सोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती, असे विजय पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in